AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi Live : महिला सगळं विसरतात पण त्या…नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, लाईव्ह येत सडकून टीका!

नारी शक्ती अधिनयमात दुरुस्ती करणारे विधेयक मंजूर होऊ न शकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. महिला हे कधीच विसरणार नाहीत, असे मोदी म्हणाले.

Narendra Modi Live : महिला सगळं विसरतात पण त्या...नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, लाईव्ह येत सडकून टीका!
narendra modi live speechImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 18, 2026 | 8:58 PM
Share

Nari Shakti Bill : लोकसभेत बहुमताचा आकडा न गाठता आल्याने गेल्या मोदी सरकारने आणलेले नारी शक्ती वंदन अधिनियम दुरुस्ती विधेयक मंजूर होऊ शकले नाही. या विधेयकाच्या माध्यमातून मोदी सरकार आपला राजकीय स्वार्थ साधत असल्याचा आरोप करत विरोधकांनी एकजूट होऊन या विधेयकाच्या विरोधात मतदान केले. दक्षिणेतील सर्व पक्षांनी एकत्र येत या विधेयकाल विरोध केला. हे विधेयक फेटाळले जाणे म्हणजे मोदी सरकारला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर लाईव्ह येत देशाशी संवाद साधला. देशातील महिला आता विरोधकांना कधीच माफ करणार नाहीत, असे मोदी म्हणाले. तसेच काँग्रेस हा पक्ष सुधारणांना विरोध करणारा पक्ष आहे, असा हल्लाबोल केला.

काही लोकांसाठी पक्षहीत हेच सर्वस्व

श म्ही खूप प्रयत्न केला, तरी आम्ही यशस्वी होऊ शकलो नाही. नारी शक्ती वंदन अधिनियमात दुरुस्ती होऊ शकली नाही. त्यासाठी मी सर्वा माता-भगिनींची माफी मागतो. आमच्यासाठी देशहीत सर्वोच्च आहे. परंतु काही लोकांसाठी पक्षहीत हेच सर्वस्व आहे. पक्षहीत हे देशहितापेक्षा मोठे असेल तर नारी शक्ती, देशाला याचे नुकसान सहन करावे लागते. यावेळीदेखील असेच झाले. काँग्रेस, डीएमके, टीएमसी, समाजवादी तसेच अन्य पक्षांच्या स्वार्थी राजकारणामुळे देशातील महिलांना नुकसान सोसावे लागत आहे, असे मोदी म्हणाले.

महिला सगळं विसरतात पण त्या कधीच….

काल देशातील करोडो महिलांची नजर संसदेवर होती. देशातील महिला पाहात होत्या. मलाही खूप दु:ख झाले. महिलांच्या हितासाठीचा हा प्रस्ताव मंजूर न झाल्यानंतर काँग्रेस, डीएमके, टीएमके, सपा यासारखे पक्ष आनंदाने टाळ्या वाजवत होते. महिलाकडून त्यांचे अधिकार हिसकावून घेऊन विरोधकांनी टाळ्या  वाजवल्या. या पक्षांनी जे केले ते महिलांच्या सन्मानावर आघात आहे. महिला सगळं विसरतात परंतु त्यांचा अपमान कधीच विसरत नाहीत. म्हणूनच काँग्रेस तसेच इतर पक्षांची भूमिका प्रत्येक महिलेच्या मनात कायम राहणार आहे. देशातील महिला जेव्हा-जेव्हा या नेत्यांना पाहतील तेव्हा-तेव्हा महिलांना या पक्षांची भूमिका आठवेल, असे म्हणत मोदी यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.

Follow Us
चादर धुतली अन् सापडलं Made in Pakistan! व्हायरल व्हिडिओने उडवली खळबळ
मोठी बातमी! चादर धुतली अन् सापडलं Made in Pakistan! चिंचवडच्या यात्रेतील व्हायरल व्हिडिओने उडवली खळबळ
पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची दुचाकीला धडक
Pune -Nashik | पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची दुचाकीला धडक, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर
स्वारगेटमध्ये मनसेचा आक्रमक पवित्रा; एसीएफ स्टडी सेंटरवर धाड
Pune | स्वारगेटमध्ये मनसेचा आक्रमक पवित्रा; एसीएफ स्टडी सेंटरवर धाड, विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप
म्हणून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळाली, रोहित पवारा यांचा मोठा दावा
.....म्हणून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळाली, रोहित पवारा यांचा मोठा दावा
उमेदवारी मागे घेताच काँग्रेसचा दणका! दोन उमेदवारांची थेट हकालपट्टी
मोठी घडामोड! उमेदवारी मागे घेताच काँग्रेसचा दणका! दोन उमेदवारांची थेट हकालपट्टी, राजकीय वर्तुळात खळबळ
सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील 34 कुटुंबांना 3.40 कोटींची मदत
Maratha Reservation | मनोज जरांगेंच्या उपोषणानंतर सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील 34 कुटुंबांना 3.40 कोटींची मदत मंजूर
बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील?
Uday Samant | बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील, उदय सामंतांचा विश्वास
तलवारींचा धाक, कारची तोडफोड; राजगड परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत
Pune | तलवारींचा धाक, कारची तोडफोड; राजगड परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
Sunil Tatkare | दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना देसाईंचं प्रत्युत्तर
Shambhuraj Desai | विधान परिषद निवडणूक: महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर, हवेतल्या गप्पा नको....