AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींकडून राहुल गांधी यांचा ‘बालकबुद्धी’ म्हणून उल्लेख, लोकसभेत प्रचंड गदारोळ

"संत तुलसीदार बोलून गेले आहेत की, झूठइ लेना झूठइ देना. झूठइ भोजन झूठ चबेना. काँग्रेसने खोट्याला राजकीय हत्यार बनवलं. काँग्रेसचे लोक खोटारडे आहेत. काहींनी 1 जुलै हा दिवस खटाखट दिवस साजरा केला. 1 जुलैला लोक आपले बँक अकाउंट चेक करत होते. 8500 रुपये बँक खात्यात आले की नाही? ते तपासत होते", असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला.

मोदींकडून राहुल गांधी यांचा 'बालकबुद्धी' म्हणून उल्लेख, लोकसभेत प्रचंड गदारोळ
नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी
| Updated on: Jul 02, 2024 | 6:02 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. विशेष म्हणजे मोदी यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख थेट ‘बालकबुद्धी’ असा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत होते. यावेळी विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. विरोधक नरेंद्र मोदी यांना भाषण करु देत नव्हते. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. पण विरोधक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात होती. अखेर मोदी यांना विरोधकांची घोषणाबाजी ऐकत भाषण करावं लागलं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली. “बालकबुद्धीचा न बोलण्याचा ठिकाणा असतो, ना व्यवहारचा कुठला ठिकाणा असतो. बालकबद्धी जास्त हावी होते तेव्हा ते या सभागृहात कुणाची गळ्यात पडतात, हे बालकबुद्ध सभागृहातील नेत्यांना डोळा मारतात. त्यांचा खरेपणा सर्व देशाला समजला आहे. त्यामुळे संपूर्ण देश म्हणत आहे की, तुमच्याकडून होणार नाही”, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

“संत तुलसीदार बोलून गेले आहेत की, झूठइ लेना झूठइ देना. झूठइ भोजन झूठ चबेना. काँग्रेसने खोट्याला राजकीय हत्यार बनवलं. काँग्रेसचे लोक खोटारडे आहेत. काहींनी 1 जुलै हा दिवस खटाखट दिवस साजरा केला. 1 जुलैला लोक आपले बँक अकाउंट चेक करत होते. 8500 रुपये बँक खात्यात आले की नाही? ते तपासत होते. हा खोटे नरेटिव्हचा परिणाम आहे. याच निवडणुकीत काँग्रेसने नागरिकांची दिशाभूल केली. माता भगिनींना महिन्याला 8500 रुपये देण्याचं खोटं आश्वासन दिलं. हेच आश्वासन काँग्रेसचं नुकसान करणार आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

‘काँग्रेसकडून सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न’

“काँग्रेसकडून काल सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. काल अग्निवीर योजनेबद्दल सभागृहात खोटं बोलण्यात आलं. काल इथे भरपूर खोटं बोलण्यात आलं. एमएसपी दिलं जात नाही, असं खोटं बोलण्यात आलं. संविधानाच्या प्रतिष्ठेच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीतून निवडून आलेले लोक सभागृहाच्या प्रतिष्ठेचा मान राखत नाहीत हे त्यांना शोभत नाही. हा संविधानाचा अपमान आहे”, असं मोदी म्हणाले.

“देश आणि स्वातंत्र्यासाठी प्राणाचं बलिदान देणाऱ्या शहिदांचा अपमान आहे. या गोष्टींना बालकबुद्धी मानूण दुर्लक्ष केलं जाऊ नये. कदापि दुर्लक्ष केलं जाऊ नये. कारण त्यामागील उद्देश चांगले नाहीत. तर खतरनाक उद्देश आहे. मी देशाच्या नागरिकांनाही याबाबत जागृत करु इच्छितो”, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.