आता फक्त 300 रुपयांत पोस्टाच्या तिकीटावर छापा स्वत:चा फोटो

मोदी सरकारच्या निर्णयामुळे तुम्ही स्वत:चा फोटोही टपाल तिकीटावर छापू शकता. एवढेच नव्हे तुम्ही लग्नाच्या वाढदिवसाला पती-पत्नीचा फोटो किंवा तुमच्या कुटुंबाचा फोटोही टपाल तिकीटावर छापू शकता. | Post tickets

आता फक्त 300 रुपयांत पोस्टाच्या तिकीटावर छापा स्वत:चा फोटो
मोदी सरकारच्या निर्णयामुळे तुम्ही स्वत:चा फोटोही टपाल तिकीटावर छापू शकता.
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 3:50 PM

नवी दिल्ली: हल्ली मोबाईल आणि व्हॉटसअ‍ॅपमुळे पत्र पाठवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, पत्र किंवा पोस्टाची तिकीटे याबद्दल लोकांनाही आजही कुतूहल वाटते. पोस्टाची तिकीटे बघून आपल्यापैकी अनेकांना यावर आपला फोटो असावा, असे वाटलेही असेल. मात्र, आतापर्यंत केवळ महान व्यक्ती आणि अतुलनीय कार्य करणाऱ्या लोकांचेच फोटो टपाल तिकीटावर छापण्याची प्रथा होती. (Print your own image on post tickets)

मात्र, आता मोदी सरकारच्या निर्णयामुळे तुम्ही स्वत:चा फोटोही टपाल तिकीटावर छापू शकता. एवढेच नव्हे तुम्ही लग्नाच्या वाढदिवसाला पती-पत्नीचा फोटो किंवा तुमच्या कुटुंबाचा फोटोही टपाल तिकीटावर छापू शकता.

काय आहे ही योजना?

भारतीय टपालच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, ही सरकारची जुनी योजनाच आहे. मात्र, अनेक लोकांना त्याविषयी माहिती नव्हती. या योजनेच्या माध्यमातून सामान्य व्यक्तीही टपाल तिकीटावर स्वत:चा फोटो छापू शकते. ‘माय स्‍टॅम्‍प’ (My Stamp) असे या योजनेचे नाव आहे.

फक्त 300 रुपयांचा खर्च

‘माय स्‍टॅम्‍प’ योजनेतंर्गत टपाल तिकीटावर तुमचा फोटो छापण्यासाठी केवळ 300 रुपये इतका खर्च येईल. यामध्ये तुम्हाला 12 टपाल तिकीटे मिळतील. विशेष म्हणजे इतर टपाल तिकीटांप्रमाणे ही तिकीटे तुम्ही व्यवहारासाठीही वापरु शकता.

फोटो छापण्यासाठी काय करावे लागेल?

टपाल तिकीटावर स्वत:चा फोटो छापण्यासाठी तुम्हाला किमान 1 शीट (12 तिकीटे) विकत घ्यावी लागतील. तुम्ही 5000 शीट खरेदी केल्यास तुम्हाला 20 टक्के डिस्काऊंटही मिळेल. 5000 शीटची किंमत प्रतिशीट 300 रुपयाप्रमाणे 15 लाख इतकी होते. मात्र, यावर 20 टक्के सूट असल्याने तुम्हाला फक्त 12 लाख रुपयेच भरावे लागतील.

फोटो छापण्यासाठी अट काय?

या योजनेतंर्गत फोटो छापण्यासाठी संबंधित व्यक्ती जिवंत असणे गरजेचे आहे. नजीकच्या टपाल कार्यालयात गेल्यास तुम्हाला या योजनेची माहिती मिळू शकते. तसेच https://www.indiapost.gov.in/Philately/Pages/Content/My-Stamp.aspx या संकेतस्थळावरही तुम्हाला ‘माय स्‍टॅम्‍प’ (My Stamp) योजनेची माहिती उपलब्ध होईल.

संबंधित बातम्या:

PPF नियमांमध्ये बदल, खातेधारकांना महत्त्वाच्या पाच सूचना

PPF | मुलांच्या नावे पीपीएफमध्ये महिन्याला हजार रुपये गुंतवा, 15 वर्षांत मोठा फंड जमवा

Post Office Scheme : पोस्टाच्या 7 सुपरहिट योजना; गुंतवणुकीवर तगडे लाभ

(Print your own image on post tickets)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.