Post Office Scheme : पोस्टाच्या 7 सुपरहिट योजना; गुंतवणुकीवर तगडे लाभ

पोस्टात जवळपास 7 पद्धतीच्या बचत योजना आहेत. त्यातील बऱ्याच योजनांना सेक्शन 80 सीअंतर्गत करातून सूट दिली जाते. (post office 7 schemes)

Post Office Scheme : पोस्टाच्या 7 सुपरहिट योजना; गुंतवणुकीवर तगडे लाभ

 नवी दिल्लीः  लॉकडाऊनमध्ये उद्योगधंदे ठप्प असल्यानं अनेकांना रोजगाराचा प्रश्न सतावतो आहे. देश हळूहळू अनलॉक होत असतानाही बऱ्याच जणांना नोकऱ्याही गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे अनेकांना कोरोनाच्या संकटात गुंतवणुकीची चिंता सतावत आहे. कुठल्या योजनेत गुंतवणूक करायची, याचाच विचार बरेच जण करत असतात. काही जण बँकेत गुंतवणूक करणाऱ्या प्राधान्य देतात. तर काही म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करतात. खेरीज पोस्टातील योजनेत(Post office Scheme) गुंतवणूक करणं हे जास्त फायद्याचं ठरत आहे. पोस्टात केलेल्या गुंतवणुकीवर आपल्याला मोठा लाभ मिळतो. कमी वेळात पोस्टात गुंतवलेली रक्कम चांगला परतावा मिळवून देते. पोस्टात जवळपास 7 पद्धतीच्या बचत योजना आहेत. त्यातील बऱ्याच योजनांना सेक्शन 80 सीअंतर्गत करातून सूट दिली जाते. (post office 7 schemes)

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC)

पोस्टाची ही खूपच प्रसिद्ध योजना आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) योजनेत डिसेंबरला संपणा-या तिमाहीसाठी 6.8 टक्क्यांनी व्याज मिळत आहे. या योजनेंतर्गत आपण 100 रुपये गुंतवू शकता. तसेच 100 रुपयांनंतर या योजनेत गुंतवणुकीला कोणतीही मर्यादा नाही. पहिल्यांदा या योजनेत गुंतवणूक करणा-याला वर्षाला 6.8 टक्के व्याज मिळत आहे. योजनेत पाच वर्षांसाठी गुंतवणूक करता येते.

पोस्ट ऑफिस मुदत ठेव (FD)

पोस्ट ऑफिस मुदत ठेवीमध्ये (FD) आपण ठराविक मुदतीसाठी एकमुखी रक्कम गुंतवू शकता. पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव या योजनेत एक ते पाच वर्षांसाठी गुंतवणूक करण्याची सुविधा आहे. यामध्ये आपण निश्चित परतावा आणि व्याजातून मिळणाऱ्या लाभाचा फायदा घेऊ शकता. मुदत ठेव (FD) खात्यांमध्ये चार पर्याय देण्यात आलेले आहेत. एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्षे, अशा कालावधीसाठी या योजनेत गुंतवणूक करता येते. या योजनेत आपण प्राप्तिकर कायदा 1961च्या कलम 80 सी अंतर्गत कर सवलत मिळवू शकता.

राष्ट्रीय पेन्शन सिस्टम (NPS)

एनपीएस ही निवृत्तीची एक योजना आहे. त्याची सुरुवात केंद्र सरकारने केली आहे. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. तसेच या योजनेत 6 वेगवेगळ्या फंडांमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा आहे. त्यात गुंतवणुकीला कोणतीही मर्यादा नाही. या सरकारी योजनेत आपण 500 रुपयांची गुंतवणूक देखील करू शकता. या योजनेअंतर्गत सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचार्‍यास एकमुखी रक्कम मिळते.

सुकन्या समृद्धी योजना

मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या विवाहाच्या तरतुदीसाठी अल्पबचतीस प्रोत्साहन देण्याकरिता डिसेंबर 2014मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली. मुलींच्या घटत्या जन्मदराची चिंता सतावत असताना त्यांच्या उत्कर्षासाठी काढण्यात आलेल्या सुकन्या योजनेचाही ग्राहकांनी भरभरून लाभ घेतला. केंद्र सरकारनं या योजनेमध्ये आणखी सुधारणा करून नियमांमध्ये काही बदल केले आहेत. सरकारनं या योजनेंतर्गत मिळणारे व्याजदर 7.6 टक्के केले आहे. या योजनेत कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. तसेच या योजनेला कलम 80 सीअंतर्गत करातून सूटही मिळते.

किसान विकास पत्र (KVP)

अल्प प्रमाणात गुंतवणुकीसाठी हा एक चांगला पर्याय आहे. या बचत योजनेवर आता 6.9 टक्के व्याज दिले जात आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास अधिक चांगला परतावा मिळतो. पण या योजनेतून करातून सूट दिली जात नाही. या योजनेत प्रथम 113 महिन्यांचा परिपक्व कालावधी होता. आता तो वाढवून 124 महिन्यांचा करण्यात आला आहे. किसान विकास पत्रात किमान 1000 रुपये जमा करावे लागतात. त्याचबरोबर जास्तीत जास्त गुंतवणुकीलाही मर्यादा नाही.

वरिष्ठ नागरिक बचत योजना(SCSS)

60 वर्षं वयाची व्यक्तीही या योजनेत खातं उघडू शकतात. 55 ते 60 वर्षं वयाच्या व्यक्ती निवृत्तीच्या तीन महिने आधीही या योजनेत खातं खोलून पैसे गुंतवू शकतात. खातं उघडल्यानंतर आपल्याला कमीत कमी 1000 रुपये जमा ठेवावे लागतात. या खात्यात आपण जास्तीत जास्त 15 लाख रुपये साठवून ठेवू शकता. ज्यावर आपल्याला वर्षाला 7.4 टक्के व्याज मिळते. या योजनेची मर्यादा पाच वर्षांची असते. वरिष्ठ नागरिक बचत योजनेवर व्याज 31 मार्च/30 सप्टेंबर/ 31 डिसेंबरला जमा करण्याच्या तारखेपासून लागू होते. त्यानंतर 31 मार्च, 30 जून, 30 सप्टेंबर, 31 डिसेंबरपर्यंत जमा रकमेवर व्याज मिळणार आहे. खात्रीशीर व्याज देणारा आणि पीपीएफच्या सुरक्षित पर्यायाचा विचार केला पाहिजे. जितक्या लवकर बचत सुरू करता येईल तितका चांगला फायदा मिळेल.

15 वर्षीय सार्वजनिक भविष्य निधी खातं(PPF)

पीपीएफचं खातं आपल्याला 100 रुपयांमध्ये उघडता येते. यातील जमा रकमेवर 7.1 टक्के व्याज दिलं जातं. खातेदारांना आपल्या खात्यात 500 रुपये आणि जास्तीत जास्त करून 1.50 लाख रुपये जमा करावे लागतात. तसेच खात्याची मर्यादा 15 वर्षांसाठी असते. यात आपण संयुक्त खातंही उघडू शकतो. आपल्याला या योजनेत नॉमिनेशनची सुविधाही प्राप्त होते. यात एका वित्त वर्षात तुम्हाला एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर चांगला फायदा मिळतो.

(या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्या गुंतवणूकतज्ज्ञांचा सल्ला घ्या, कोणत्याही योजनेची अद्ययावत माहितीसाठी संबंधित वेबसाइटला भेट द्या)

संबंधित बातम्या :

PPF नियमांमध्ये बदल, खातेधारकांना महत्त्वाच्या पाच सूचना

PPF | मुलांच्या नावे पीपीएफमध्ये महिन्याला हजार रुपये गुंतवा, 15 वर्षांत मोठा फंड जमवा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *