AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मोदी सरकारमध्ये फेरबदल होणार? या राज्यातील नेत्यांना संधी; महाराष्ट्राचे…

Modi Government Cabinet Expansion : भाजपच्या राष्ट्रीय पातळीवर मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 21 मे रोजी मोदींच्या बैठकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि संघटनात्मक बदलांवर निर्णय होण्याची शक्यता.

मोठी बातमी! मोदी सरकारमध्ये फेरबदल होणार? या राज्यातील नेत्यांना संधी; महाराष्ट्राचे...
Modi Cabinet ReshuffleImage Credit source: Google
| Updated on: May 16, 2026 | 4:08 PM
Share

भाजपला अलिकडेच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळालेले आहे. खासकरून पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपने सरकार स्थापन केले आहे. त्यानंतर आता भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपमध्ये आता पक्षांतर्गत आणि केंद्र सरकारमध्ये मोठ्या फेरबदलांच्या चर्चांना वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन पक्षांतर बदल करण्याच्या तयारीत आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

2024 च्या निवडणुकीत लोकसभेत स्वबळावर बहुमत न मिळाल्यानंतर भाजपाने जेडीयू आणि तेलुगु देसम पार्टी सारख्या मित्रपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले होते. 9 जून 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात कोणताही विस्तार किंवा फेरबदल झालेला नाही. त्यामुळे यावेळी मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

21 मे रोजी महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन

21 मे 2026 रोजी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत मंत्रिमंडळात फेरबदल करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजप नेत्यांच्या मते, आगामी निवडणुकांच्या रणनीतीच्या दृष्टीने हा संघटनात्मक बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पक्ष 2027 मधील विधानसभा निवडणुका, राष्ट्रपती निवडणूक आणि 2029 लोकसभा निवडणुकांची तयारी आतापासूनच सुरू करत आहे.

सध्या केंद्रीय मंत्री असलेल्या काही नेत्यांच्या जागी प्रदेशाध्यक्षपद सांभाळलेल्या काही वरिष्ठ नेत्यांना संधी दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अनुभवी नेत्यांकडे पक्षविस्ताराची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेश आणि पंजाबसारख्या महत्त्वाच्या राज्यांत निवडणुका होणार असल्याने मजबूत नेतृत्व आणि अचूक रणनीतीची गरज आहे, याच दृष्टीने भाजप सध्या विचार करत आहे.

युवा आणि महिलांना प्राधान्य मिळण्याची शक्यता

2027 मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. यापैकी पाच राज्यांत भाजपाचे सरकार आधीपासूनच सत्तेत आहे. एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, ‘केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राष्ट्रीय टीममध्ये नुकत्याच निवडणुका झालेल्या राज्यांतील चेहऱ्यांना तसेच आगामी निवडणूक राज्यांना प्रतिनिधित्व दिले जाऊ शकते. पुढील दशकाची रणनीती लक्षात घेऊन युवा नेते, महिला आणि काही व्यावसायिक व्यक्तींनाही संधी दिली जाईल.’ दरम्यान, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राला प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता कमी आहे.

Follow Us
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.