Goa CM Oath Taking Ceremony: हाव डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत… देवाचो सोपूत घेता की… सावंत यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

गोव्याचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. गोव्याचे ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

Goa CM Oath Taking Ceremony: हाव डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत... देवाचो सोपूत घेता की... सावंत यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
हाव डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत... देवाचो सोपूत घेता की... Image Credit source: ani
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 11:45 AM

पणजी: गोव्याचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ (Goa CM Oath Taking Ceremony) घेतली आहे. गोव्याचे ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सावंत कोंकणी भाषेत शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते. सावंत यांनी शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं. सावंत यांच्यासोबत विश्वजीत राणे, सुभाष शिरोडकर, मौविन गोडीन्हों, रवि नायक, निलेश काब्रल, रोहण खौंटे, अटॉनोसियो मोन्सेरात आणि गोविंद गौड आदींनाही पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली आहे. या सर्व मंत्र्यांचा आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच सावंत हे लवकरच कॅबिनेटची बैठक बोलावणार असून त्यात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

आज सकाळी 11 वाजता प्रमोद सावंत यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासह आठ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला उपस्थित होते. त्यांनी सर्व मंत्र्यांचे अभिनंदन केले.

शपथविधी सोहळ्यापूर्वी पूजाअर्चा

प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळ्यासाठी भव्य स्टेज तयार करण्यात आला होता. त्यावर गोंय सरकार शपथविधी सुवाळो असं वाक्य लिहिलं होतं. या स्टेजच्या भोवती भव्य पोस्टर्स लावण्यात आले आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जेपी नड्डा यांचे फोटो होते. शपथविधी सोहळ्यापूर्वी डॉ. प्रमोद सावंत यांनी घरात पूजा अर्चा केली. प्रमोद सावंत यांनी मनोभावे कुलदैवतेला साकडे घातले. त्यानंतर ते शपथविधीसाठी घराबाहेर पडले.

फडणवीसांकडून पाहणी

भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि सीटी रवी यांनी कालच श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर जाऊन शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली होती. तसेच फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना तयारीच्या अनुषंगाने काही सूचनाही दिल्या होत्या. महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीने भाजपला पाठिंबा दिल्याने राज्यात स्थिर सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या:

Goa CM Oath Taking Ceremony: गोंय सरकार शपथविधी सुवाळो, मुख्यमंत्र्यांसह 8 मंत्री शपथ घेणार, दोन हजार पोलीस तैनात, तटरक्षक दल अ‍ॅलर्ट

Pramod Sawant : आज गोव्यात शपथविधी, प्रमोद सावंत दुसऱ्यांदा होणार मुख्यमंत्री, नव्या मंत्रिमंडळात कुणाला संधी?

देशातील किमान 10 राज्यांत हिंदू ‘अल्पसंख्याक’ ठरणार; केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिली ‘ही’ माहिती

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.