AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये मोठी फूट पडेल… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाकीत; मोदींच्या दाव्याने मोठी खळबळ

बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे, भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, दरम्यान त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं भाकीत केलं आहे, येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये मोठी फूट पडेल असं त्यांनी म्हटलं आहे.

येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये मोठी फूट पडेल... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाकीत; मोदींच्या दाव्याने मोठी खळबळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 14, 2025 | 9:24 PM
Share

आज बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, या निवडणुकीमध्ये काँग्रेससह महाआघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागाला, तर एनडीएला मोठं यश मिळालं आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान यानंतर जनतेशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच यावेळी बोलताना त्यांनी मोठं भाकीत देखील केलं आहे, येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये मोठी फूट पडेल असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी एनडीएला दिलेल्या स्पष्ट बहुमताबद्दल बिहारच्या जनतेचे आभार देखील व्यक्त केले आहेत.

नेमकं काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी? 

आज एका विधानसभेत आम्हाला जेवढ्या जागा मिळाल्या तेवढ्या जागा काँग्रेसला लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या निवडणुकीतही मिळाल्या नाहीत. काँग्रेसचा निवडणुकीचा आधार केवळ निगेटिव्ह झाला आहे. चौकीदार चोर म्हणायचं, कधी ईव्हीईएमवर आरोप, कधी मतचोरीचा आरोप, कधी निवडणूक आयोगाला शिव्या घालणं, देशाच्या शत्रूचे अजेंडे समोर आणणं सुरू आहे. काँग्रेसकडे पॉझिटिव्ह व्हिजन नाहीये. आज काँग्रेस मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस म्हणजे एमएमसी झाली आहे. ही काँग्रेस मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस आहे. आणि काँग्रेसचा संपूर्ण अजेंडा त्यावरच चालत आहे. त्यामुळे काँग्रेसमध्येही दुसरा गट निर्माण होत आहे. हा गट निगेटिव्ह पॉलिटिक्सच्या विरोधात आहे. जे काँग्रेसचे नेते निगेटिव्हि पॉलिटिक्स घेऊन जात आहे, त्याच्या विरोधात अंतर्गत धुसफूस सुरू आहे. मला वाटतं येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये मोठी फूट पडेल, असं यावेळी मोदी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  काँग्रेसच्या मित्र पक्षांनाही कळतंय की काँग्रेस त्यांच्या निगेटिव्ह पॉलिटिक्समध्ये सर्वांना घेऊन डुबत आहे. त्यामुळेच मी बिहार निवडणुकीत सांगितलं होतं की काँग्रेसचे नामदार तलावात डुबकी मारून बिहार निवडणुकीत स्वत डुबण्याची आणि इतरांना डुबवण्याची प्रॅक्टिस करत आहेत. मी आधीही या मंचावरून काँग्रेसच्या साथीदारांना सावधान केलं होतं. काँग्रेस ही परजीवी आहे, ते आपल्या सहकाऱ्यांचे व्होट बँक घेऊन पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मित्रपक्षांनी त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे, असा हल्लाबोल यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला आहे.

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच