AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही ‘ट्रॉली टाईम्स’ वाचलाय? शेतकरी आंदोलकांनीच सुरु केलेला पेपर काय छापतो? वाचा…

मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज (19 डिसेंबर) 24 वा दिवस आहे. कडाक्याच्या थंडीतही या शेतकऱ्यांचा उत्साह कायम आहे.

तुम्ही 'ट्रॉली टाईम्स' वाचलाय? शेतकरी आंदोलकांनीच सुरु केलेला पेपर काय छापतो? वाचा...
| Updated on: Dec 19, 2020 | 6:32 PM
Share

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज (19 डिसेंबर) 24 वा दिवस आहे. कडाक्याच्या थंडीतही या शेतकऱ्यांचा उत्साह कायम आहे. सिंधु बॉर्डरवर थंडीची लाट आलेली असताना देखील शेतकरी ठाम निर्धाराने आंदोलनाच्या निर्मयावर टिकून आहेत. आता तर या आंदोलक शेतकऱ्यांनी आंदोलनाविषयीची प्रत्येक बित्तंबात इतर आंदोलकांपर्यंत पोहचवण्यासाठी आपलं स्वतंत्र वर्तमानपत्र सुरु केलंय. ‘ट्रॉली टाईम्स (Trolley Times)’ असं या पुस्तकाचं नाव आहे. हे वर्तमानपत्र 4 पानाचं असून यात शेतकऱ्यांची दिनचर्या, शेतकरी नेत्यांच्या मुलाखती आणि आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांचे किस्से छापले जात आहेत (Protesting Farmer print Trolley Times their own Newspaper to spread information in Delhi).

आंदोलक शेतकऱ्यांचं हे वर्तमानपत्र हिंदी आणि पंजाबी भाषेत प्रकाशित होत आहे. यात देशभरातील शेतकरी आंदोलनाविषयीच्या बातम्या छापल्या जातात. या आंदोलनाच्या सुरुवातीपासून शेतकरी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. मात्र, आता या आंदोलक शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच निशाणा साधण्यास सुरुवात केलीय. आंदोलनाच्या ठिकाणी मोदी, अंबानी आणि अदानी यांची मिलीभगत असल्याच्याही घोषणा दिल्या जात आहेत.

आंदोलकांच्या वर्तमानपत्रावर भगतसिंगांच्या ओळी

शुक्रवारी (18 डिसेंबर) दिल्लीच्या सिंधु आणि टिकरी बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात या वर्तमानपत्राची पहिली प्रत पडली. हे वर्तमानपत्र खास शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी काढले आहे. ट्रॉली टाईम्समध्ये, ‘इनकिलाब दि तलवार विचारां दि सान ते तेज होंदी ए (क्रांतीची तलवार विचारांच्या रसायनाने चमकते’) या ओळी होत्या. शहीद भगत सिंग यांचा संदर्भ देऊन हे वाक्य वापरण्यात आलंय.

वर्तमानपत्राचा उद्देश काय?

या वर्तमानपत्राचा उद्देश दिल्लीतील सीमेवर अनेक किलोमीटरपर्यंत पसरलेल्या आंदोलनातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहचणे हा आहे. शेतकरी आंदोलनाच्या मंचावर होणाऱ्या भाषणांची आणि निर्णयांची माहिती. सरकारसोबतच्या चर्चेचे तपशील मंचापासून दूरवर असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी हे वर्तमानपत्र काढलं जात आहे.

12,000 रुपयांमध्ये 2,000 प्रती

दिल्लीच्या सीमेवर 26 नोव्हेंबरला सुरु झालेलं हे शेतकरी आंदोलन आणखी आक्रमक होणार आहे. या आंदोलनात मोदी सरकारचे नवे 3 कृषी कायदे रद्द करण्याची मागणी होत आहे. दिल्लीच्या सिंधु आणि टिकरी सीमेवर सध्या जवळपास 3 लाख शेतकरी जमा झाले आहेत. अनेक लोक मंचापर्यंत पोहचू शकत नाही. त्यांच्यापर्यंत आंदोलनाची पूर्ण माहिती पोहचावी म्हणून ‘ट्रॉली टाइम्स’ महत्त्वाचा ठरणार आहे. केवळ 12,000 रुपयांमध्ये याच्या 2,000 प्रती छापण्यात आल्या. यापैकी 1,200 सिंधु बॉर्डरवर आणि 800 टिकरी बॉर्डरवर वाटण्यात आल्या.

हेही वाचा :

किसान सभेचा ‘चलो दिल्ली’चा नारा, नाशिक ते दिल्ली 1266 किमीचा प्रवास करुन हजारो शेतकरी दिल्लीला धडक

यूपीए सरकारनं केलेल्या पापाचं प्रायश्चित म्हणजे नवे कृषी कायदे- नरेंद्र मोदी

Farmer Protest | शेतकरी आंदोलन थांबवण्याला सर्वोच्च न्यायालयाचा नकार, ‘या’ मुद्द्यावर सर्वाधिक जोर

Protesting Farmer print Trolley Times their own Newspaper to spread information in Delhi

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.