Assembly election 2022 | पंजाब काँग्रेसमधील चन्नी-सिद्धू वाद चव्हाट्यावर, उमेदवारीवरून मतभेद

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे 25 जानेवारीला घोषित होण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया 1 फेब्रुवारपर्यंत चालू राहणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या नावांची यादी 2 फेब्रुवारीला पुन्हा एकदा तपासली जाणार आहे. तर 4 फेब्रुवारीला उमेदवारी माघार घेण्याचा दिवस आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या निवडणूकीबरोबरच पंजाबच्या निवडणूकीतही आता रंग चढला आहे.

Assembly election 2022 | पंजाब काँग्रेसमधील चन्नी-सिद्धू वाद चव्हाट्यावर, उमेदवारीवरून मतभेद
panjab congress
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 2:09 PM

दिल्लीः काँग्रेसने (Congress) आगामी पंजाब निवडणूकीसाठी (Punjab Assembly election 2022) जाहीर केलेल्या उमेदवारांसाठी काँग्रेसच्या समितीची बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीमध्ये उमेदवारांबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहेत. पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिद्धू (Navjot singh sidhu)आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्यामध्ये आता उमेदवारीवरून होत असलेले मतभेद समोर येत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तूळात उलटसुलट चर्चांना उधान आले आहे.

उत्तराखंडमधील निवडणूकीतील उमेदवारांसाठी पक्षाच्या सूचना जाहीर करण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. पंजाबमधील ३१ जागांवर लढणाऱ्या उमेदवारांबाबत चर्चा करण्यासाठी एक उपसमिती नेमली आहे. या समितीमध्ये काँग्रेसचे मुख्य संघटक के. सी. वेणूगोपाल, वरिष्ठ नेत्या अंबिका सोनी असणार आहेत.

एकमेकांचा एकमेकांसोर आदर

मुख्यमंत्रा चन्नी आणि सिद्धू हे एकमेकांसमोर एकमेकांचा आदर व्यक्त करत, पंजाब काँग्रेससाठी पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असणार असे जरी सांगत असले तरी त्यांच्यातील मतभेद आता लपून राहिले नाहीत. सिद्धू यांनी पंजाबचे विस्तृत मॉडेल सादर केले आहे मात्र त्यावर बोलताना सांगितले आहे की, हे मॉडेल कोणतेही पद घेण्यासाठी किंवा फायदा उठविण्यासाठी घेतले गेले नाही तर पक्षासाठी केले आहे. त्यानंतर त्यांनीच सांगितले आहे की, मुख्यमंत्री पदाचा उमेदवार पक्षाकडून अंतिम केला जाणार आहे.

‘आप’चे भगवंत मान

आम आदमी पक्षाकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून भगवंत मान यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या नावावरच आता पंजाब निवडणूक लढविली जाईल असे पक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

पक्षाच्या चिन्हावरच कॉंग्रेस ठाम

पंजाब काँग्रेसचा मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या शिरोमणी दलाकडून अजूनही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. मात्र पक्षाचे अध्यक्ष सुखबीर सिंग हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असू शकतात अशी शक्यताही वर्तवली जात आहे. तरीही काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदासाठी अजून नावे जाहीर केले नसल तरी पक्षाच्या कर्तत्वावर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.

संबंधित बातम्या

शिवसेनेची पावलं दिल्लीच्या दिशेने पडतायत संजय राऊतांची घोषणा

OBC reservation | ओबीसी आरक्षणाबाबत भुजबळ मुख्यमंत्र्यांना काय माहिती देणार; सरकारची काय तयारी सुरू?

नाना पटोले यांच्या बंगल्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढला

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.