AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi: मोदी सरकार कोसळणार? CJP आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांचा मोठा बॉम्ब, तो दावा काय?

Rahul Gandhi on Modi Government: सीजेपी आंदोलनचा वणवा पेटण्यापूर्वीच धरपकड सुरू नेत्यांची धरपकड सुरू झाली आहे. त्याचवेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी खळबळजनक दावा केला आहे. दिल्लीत काय घडामोडी सुरू आहे?

Rahul Gandhi: मोदी सरकार कोसळणार? CJP आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांचा मोठा बॉम्ब, तो दावा काय?
सरकार कोसळणार हे खात्रीने सांगतो, राहुल गांधी यांचा दावा
| Updated on: Oct 10, 2026 | 11:26 AM
Share

Rahul Gandhi on Modi Government: “सरकार कोसळणार, हे खात्रीने सांगतो”, असा मोठा दावा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. SIR प्रक्रिया रद्द करावी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. तर त्याचवेळी आज सीजेपीचे जंतरमंतरवर आंदोलन होणार आहे. त्याचवेळी राहुल गांधी यांचा हा दावा करणारा व्हिडिओ समोर आला आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

दिल्लीत आज जंतरमंतरवर सीजेपीचे आंदोलन होणार आहे. त्याचवेळी काँग्रेसनेही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी एल्गार पुकारला आहे. आपल्याला भारतीय नागरिकांचा पूर्ण पाठिंबा आहे, असे राहुल गांधी म्हणाले. सरकार कोसळणार हे खात्रीने सांगतो, असा दावाही त्यांनी केला. समजून घ्या. अंमलबजावणीकर्ते, आपल्याला सेवा देणारे हे काही राजे नाहीत. भारतीय नागरिकांची सेवा करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. त्यांना काय वाटतं, ते कोण आहेत? हाच लोकांचा आवाज आहे. तुम्ही या देशाचा आवाज आहात. ते कोण आहेत तुम्हाला सांगणारे की ते तुम्हाला भेटणार नाहीत? असा जबरी टोलाही त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना लगावला.

राहुल गांधी यांची पोस्ट व्हायरल

या आठवड्यात इंडिया आघाडी आणि काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधा मोर्चा उघडला. पहिल्याच दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे खासदारांनी मोर्चा वळवला. पण पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर आकाशवाणी भवनात आंदोलन छेडण्यात आले. संध्याकाळपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी निदर्शनं करण्यात आली. तिसऱ्या दिवशी इंडिया आघाडीच्या खासदारांनी राजघाट येथे शांततापूर्ण सत्याग्रह आणि आंदोलन केले. तर काल लंच डिप्लोमसीनंतर आंदोलन करण्यात आले. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला. यावेळी सदस्यांनी ग्यानू तो गियो अशा घोषणा देत संताप व्यक्त करण्यात आला.

राहुल गांधी यांच्या आंदोलनाला समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) यासह 19 पक्षांचा पाठिंबा मिळाला. त्यानंतर इतर दिवशी काही पक्षाचे खासदार दिसले नाही. काँग्रेसचे जे खासदार या आंदोलनाला उपस्थित नव्हते त्यांचे कान पिळण्यात आले. त्यानंतर अनेक खासदार आंदोलनात सहभागी झाले. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगासोबतच भाजपवरही टीकास्त्र डागले आहे.

Follow Us
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल