AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi: पोलिसांना कारवाईचे आदेश गृह मंत्र्यालयाने दिले, राहुल गांधींचा गंभीर आरोप , लोकसभेत तुफान हंगामा

प्रश्नपत्रिका फुटीविरोधातील कायद्याच्या दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याप्रकरणी काही मुद्यांवर त्यांनी लोकसभेचे लक्ष वेधले. विद्यार्थी, मूर्ख आणि अंधभक्त असे तीन शब्द त्यांनी वापरले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिक्षण संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तर विद्यार्थ्यांवर पोलिसांना कारवाईचे आदेश गृहमंत्रालयाने दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

Rahul Gandhi: पोलिसांना कारवाईचे आदेश गृह मंत्र्यालयाने दिले, राहुल गांधींचा गंभीर आरोप , लोकसभेत तुफान हंगामा
राहुल गांधी
| Updated on: Jul 29, 2026 | 2:02 PM
Share

NEET सह देशातील इतर परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीविरोधातील कायदा दुरुस्ती विधेयकावर कालपासून लोकसभेत घमासान चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत आज धुरळा उडवून दिला. त्यांनी पोलिसांना विद्यार्थ्यांवर कारवाईचे आदेश गृहमंत्रालयाने दिल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर एकच गदारोळ उठला. सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांनी या दाव्याच्या पुष्ट्यार्थ पुरावा देण्याची आग्रही भूमिका मांडली. राहुल गांधी यांनी या वक्तव्यासाठी माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली. त्यानंतर गोंधळ वाढला. राहुल गांधी यांनी आपला माईक बंद करण्यात आल्याचा आरोप केला. तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज तहकूब केले.

तरुणांचा राग हिंसा कशी?

विद्यार्थी, मूर्ख आणि अंधभक्त हे उदाहरण देताच सत्ताधाऱ्यांनी एकच गोंधळ केला. विरोधी पक्षनेते असंसदीय शब्द वापरत असल्याचा दावा त्यांनी केला. विद्यार्थ्यांचे आंदोलन हा राग नव्हता. द्वेष तर नव्हताच नव्हता. विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांचा राग हा योग्य होता, असे राहुल गांधी म्हणाले. देशाने पण तरुणाची भाषा समजली पण सरकारला त्यांची भावना उमगली नाही. राहुल गांधी म्हणाले की देशाचे भविष्य रस्त्यावर उतरले. मी विचार करत होतो की कुठून भाषण सुरू करु. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांची भावना दिसत होती. तरुणांचा राग हिंसा कशी? भाजप नेत्यांनी त्यांच्या मुलांना विचारावं, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर निशाणा

लोकसभेत पेपरफुटीविरोधातील कायद्याच्या दुरुस्तीविधेयकावर बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर थेट निशाणा साधला. या देशाच्या भविष्याने रस्त्यावर उतरून जे काही केले, तो ना राग होता ना, द्वेष ना, हिंसा. तर तो या देशातील तरुणाईचा आवाज होता. सर्व राजकीय पक्षांनी तरुणांच्या आवाजाचा सन्मान करायला हवा. त्यात भाजपमधील माझे मित्रांचा पण समावेश आहे. भाजपमधील माझ्या मित्रांनी, त्यांच्या मुलांना विचारावे की, त्यांचे भाऊ-बहीण काय करत होते. तर ते सांगितील की त्यात काहीच चूक नाही. प्रत्येक भारतीयाला तसे करायला हवे. मी ही गोष्ट सर्वांसमोर ठेवली आहे.

राहुल गांधी यांनी सांगितले की, विद्यार्थी हा सत्यासाठी धावत आहे. विद्यार्थ्यांसाठी सत्य हे गोड असते. मी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान अनेक विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. आमचे विद्यार्थी, शिक्षण व्यवस्था, खर्चाची माहिती देते होते. 8-10 तास मुलं अभ्यास करतात असे राहुल गांधी म्हणाले. दरम्यान राहुल गांधी यांच्या माफीवरून सत्ताधारी अडून बसले त्यांनी एकच गदारोळ केला.  त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी लोकसभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब केले.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार