हातात हिरवी सुटकेस, रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी तरुणाला पकडलं, आत जे निघालं ते पाहून पोलीसही हादरले
एक धक्कादायक घटना समोर आली आहे, रेल्वे स्टेशनवर एका व्यक्तीचा संशय आल्यानं रेल्वे पोलिसांनी या व्यक्तीच्या बॅगची झडती घेतली, त्यामध्ये जे निघालं ते पाहून पोलिसांना प्रचंड धक्का बसला आहे.

बिहारमध्ये संपूर्णपणे दारूबंदी आहे, मात्र तरी देखील दारूची विक्री सुरूच असल्याचं आता समोर आलं आहे. दिल्ली, हरियाणा यासारख्या राज्यांमधून बिहारमध्ये दारूचा पुरवठा होत आहे. उत्तर रेल्वेच्या बरेली जंक्शनवर एका व्यक्तीला जीआरपी आणि आरपीएफनं पकडलं. ज्याच्याकडून तब्बल 72 दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. तो या सर्व बाटल्या सुटकेसमध्ये ठेवून बिहारच्या दिशेनं निघाला होता, त्याच दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एक व्यक्ती त्याच्याकडे असलेल्या हिरव्या रंगाच्या सुटकेसमध्ये दारूच्या बाटल्या घेऊन निघाला होता, मात्र बरेली जंक्शनवर जीआरपी आणि आरपीएफला त्याचा संशय आला, त्याला पकडण्यात आलं, त्याच्या सुटकेसची झडती घेतली असता त्यामध्ये तब्बल दारूच्या 72 बाटल्या आढळून आल्या आहेत. जीआरपीएफ अधिकारी सुशील कुमार वर्मा आणि आरपीएफ अधिकारी विनीता कुमारी यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखी ही कारवाई करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास बरेली रेल्वे स्थानकावर चेकिंग सुरू होती. याच दरम्यान या व्यक्तीच्या बॅगची देखील तपासणी करण्यात आली, तर त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आढळून आला, त्याच्याकडे दोन सुटकेस आणि एक बॅग होती, त्या सर्वांमध्ये दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत.
आरोपीकडून रॉयल स्ट्रॉगच्या 56 बाटल्या तर सिग्नेचरच्या आठ बाटल्या आणि ब्लिंडर प्राईडच्या आठ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. आपलं नाव अरबाज असल्याचं आरोपीने पोलीस चौकशीमध्ये सांगितलं. तो बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातल्या चरागाह गावचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. घटेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
घटनेबाबत अधिक बोलताना जीआरपी अधिकारी सुशील कुमार यांनी सांगितलं की, हा आरोपी राजधानी एक्स्प्रेसमधून दारू बिहारमध्ये नेण्याच्या तयारीमध्ये होता. याच दरम्यान ही कारवाई करण्यात आली, आम्ही आरोपीकडून दारूच्या 72 बाटल्या जप्त केल्या आहेत. आरोपीला पकडण्यात आलं असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास सुरू आहे.
