Azadi ka amrut mahotsav: आझाद हिंद सेनेतील स्वातंत्र्यसैनिक राजाराम शुक्ला; ज्यांना पाकिस्तानातील तुरुंगातून भोगावी लागली होती सजा…
विकास शुक्ला सांगतात की, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आमचे बाबा बहाद्दूर होते. देशासाठी जे जे करता येईल ते ते त्यांनी केले आहे. पण सरकार आणि सरकारी यंत्रणेला मात्र स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांची काय अवस्था आहे हे जाणून घेण्याचीही त्यांची इच्छा नाही. आज

मुंबईः उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) अमेठी जिल्ह्यातील एकुलते एक स्वातंत्र्य संग्रामातील सेनानी म्हणजे राजाराम शुक्ला (Rajaram Shukla Freedom Fighter) होते. स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे वीरजवान राजाराम हे फिरंगी सेनेचे पहिले जवान होते. स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी नेताजी सुभाष चंद्र बोस (Subhash Chnadra Bose) यांचे भाषण ऐकून, त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन राजाराम शुक्ला आझाद हिंद सेनेत सामील झाले. त्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी सहभाग घेतल्यानंतर त्यांना मुल्तान आणि सिंगापुराच्या तुरुंगामध्ये तुरुंगवास भोगावा लागला होता.
आयुष्यभर अविवाहित
स्वातंत्र्यलढ्यातील या सैनिकाने आयुष्यभर अविवाहित राहिला. राजाराम शुक्ला यांना एका कुटुंबान लहान असताना त्यांना दत्तक घेतले होते, आयुष्यभर राजाराम शुक्ला यांनी दत्तक घेतलेल्या कुटुंबाची सेवा केली, आणि 19 ऑगस्ट 2014 रोजी या जगाचा त्यांनी निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर राज्यसरकारतर्फे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. राजाराम शुक्ला यांचा जन्म 1912 मध्ये अमेठी जिल्ह्यातील कोतवाली भागातील रायदैपूर येथील दतादिन शुक्ला यांच्या घरी झाला होता.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा प्रभाव
लहानपासूनच ते तल्लक बुद्धीचे म्हणून ओळखले जात होते, 1912 मध्ये ज्या राजाराम शुक्ला यांचा जन्म झाला होता, त्यानंतर वयाच्या 28 व्या वर्षी म्हणजेच 1940 मध्ये ते इंग्रजी सैन्यात भरती झाले. भरतीनंतर 1 वर्षानंतर त्यांना 1941 मध्ये सिंगापूरला पाठवण्यात आले होते. त्यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे भाषण त्यांनी सिंगापूरमध्ये ऐकले, आणि त्यांच्या भाषणाने प्रभावित होऊन त्यांनी ब्रिटिश सैन्याला सोडचिठ्ठी देऊन ते आझाद हिंद सेनेत दाखल झाले.
स्वातंत्र्य सैनिक सन्मान पेन्शन योजना
राजाराम शुक्ल यांनी इंग्रज सैन्याबरोबर अनेक वेळा सामना केला होता, त्यांच्यासोबत युद्ध लढले होते, इंग्रजी सैन्याबरोबर लढत असतानाही त्यांनी कधी हार मानली नाही. एका युद्धाच्या प्रसंगी त्यांना पकडून सिंगापूरच्या तुरुंगात त्यांना टाकण्यात आले, त्यानंतर त्यांची रवानगी पाकिस्तानातील मुलतान जेलमध्येही करण्यात आली होती. पाकिस्तानातील तुरुंगामध्ये 4 वर्षे 6 महिन्याचा तुरुंगवास त्यांनी भोगला होता. त्यानंतर 1946 मध्ये त्यांची लाल किल्ल्यावरुन त्यांची सुटका झाल्याचे घोषित करण्यात आले आणि 1972 पासून केंद्र व राज्यातून स्वातंत्र्यसैनिक सन्मान निवृत्ती वेतन योजनेचा त्यांना लाभही देण्यात आला.
स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांकडे सरकारचे दुर्लक्ष
विकास शुक्ला सांगतात की, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आमचे बाबा बहाद्दूर होते. देशासाठी जे जे करता येईल ते ते त्यांनी केले आहे. पण सरकार आणि सरकारी यंत्रणेला मात्र स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांची काय अवस्था आहे हे जाणून घेण्याचीही त्यांची इच्छा नाही. आज अनेक सरकारे स्वातंत्र्यसैनिकांसाठी मोठ-मोठे दावे करत असले तरी ना त्यांच्या नावाने काही केले आहे ना त्यांच्या नावाने एकादा पुतळा उभा राहिला आहे. ज्या गावात राजाराम शुक्ला यांचा जन्म झाला त्या गावात जाण्या येण्याच्या रस्त्याचीही आज वाईट अवस्था आहे, आणि त्या रस्त्यावरुन प्रवास करणेही अवघड आहे.
