राजस्थानमध्ये 75 वर्षीय महिलेने बाळाला जन्म दिला

राजस्थानमध्ये एका 75 वर्षीय महिलेने आयव्हीएफ पद्धतीने एका नवजात मुलाला जन्म (Rajsthan old women give birth to baby boy) दिला आहे. त्यामुळे डॉक्टरासंहीत सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

राजस्थानमध्ये 75 वर्षीय महिलेने बाळाला जन्म दिला

जयपूर : राजस्थानमध्ये एका 75 वर्षीय महिलेने आयव्हीएफ पद्धतीने एका नवजात मुलाला जन्म (Rajsthan old women give birth to baby boy) दिला आहे. त्यामुळे डॉक्टरासंहीत सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. शनिवारी (12 ऑक्टोबर) ही या महिलेने मुलीला जन्म (Rajsthan old women give birth to baby boy) दिला. मुलीचे वजन 600 ग्राम भरले आहे. महिलेला कोटाच्या किंकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बाल रोग तज्ञ सध्या या नवजात मुलीचा सांभाळ करत आहे. महिलेने यापूर्वी एका मुलाला दत्तक घेतले होते. पण तिला स्वत:चा मुलगा हवा होता आणि यासाठी तिने आई होण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते, असं वैद्यकीय अधिकारी अभिलाष किंकर यांनी सांगितले.

महिलेला स्वत:चे मुल हवं असल्यामुले तिने आयव्हीएफ पद्धतीचा वापर केला. त्यामध्ये यश मिळाल्यानंतर आईचे वय वाढल्यामुळे सहा महिन्यानंतर तिच्या मुलाला जन्म द्यावा लागला. कारण आई शारीरिक आणि आरोग्यामध्ये कमजोर होती.

सर्वात मोठी अडचण म्हणजे या महिलेला एकच फुफ्फुस होते. त्यामुळे डॉक्टरांसाठी हे एक मोठे आव्हान होते. पण सर्व यशस्वीपणे पार पडले, असंही किंकर यांनी सांगितले.

दरम्यान, काहीदिवसांपूर्वी राजस्थानमध्ये एका महिलेने एकाचवेळी पाच मुलांना जन्म दिला होता. महिलेने जन्म देताच ही बातमी बाऱ्यसारखी संपूर्ण देशभर पसरली होती. जयपूर येथील जनाना रुग्णालयात ही घटना घडली. रुक्साना असं या महिलेच नाह आहे. जन्म दिलेल्या मुलांमध्ये तीन मुलं आणि दोन मुलींचा समावेश आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *