Bulldozer Model : बुलडोझर मॉडेल सुसाट असतानाच नाशिकमध्ये समतेचा नारा; नाशिकच्या होलीक्रॉस चर्चमध्ये इफ्तारनंतर नमाजचे पठण

नाशिक : देशात सध्या मोठ्या प्रमाणावर धर्म, जाती आणि आजानच्या राजकारणावरून भेद केला जात आहे. हनुमान जयंती (Hanuman Jayanti) दिनी देशाची राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये हिंसाचार (Jahangirpuri violence) झाला आणि त्याचे पडसाद अख्या देशात पहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात सुरू झालेले भोंग्यावरचे राजकारण उत्तर प्रदेशनंतर मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा आणि उत्तराखंड येथेही परले. त्यानंतर जशाच तसे म्हणत […]

Bulldozer Model : बुलडोझर मॉडेल सुसाट असतानाच नाशिकमध्ये समतेचा नारा;  नाशिकच्या होलीक्रॉस चर्चमध्ये इफ्तारनंतर नमाजचे पठण
नाशिकच्या होलीक्रॉस चर्चमध्ये इफ्तारनंतर नमाजचे पठणImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 2:02 PM

नाशिक : देशात सध्या मोठ्या प्रमाणावर धर्म, जाती आणि आजानच्या राजकारणावरून भेद केला जात आहे. हनुमान जयंती (Hanuman Jayanti) दिनी देशाची राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये हिंसाचार (Jahangirpuri violence) झाला आणि त्याचे पडसाद अख्या देशात पहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात सुरू झालेले भोंग्यावरचे राजकारण उत्तर प्रदेशनंतर मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा आणि उत्तराखंड येथेही परले. त्यानंतर जशाच तसे म्हणत जहांगीरपुरीमध्ये अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर उत्तर प्रदेशचे बुलडोझर मॉडेल हे मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली, हरियाणा आणि उत्तराखंड येथे वापरण्यात येत आहे. येथे संशयाच्या आधारावर एखाद्याचे घर-दुकान पाडण्यासाठी किंवा राजकीय विरोधकांचा काटा काढण्यासाठी आता हे बुलडोझर मॉडेल (Bulldozer model) वापरले जात आहे. अशातच शिव-शाहु-फुले-आंबेडकरांच्या विचारावर चालणाऱ्या महाराष्ट्रात मात्र जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या घटना समोर येत आहेत. महाराष्ट्रातील नाशिकच्या होलीक्रॉस चर्चमध्ये मुस्लिम समाजातील लोकांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर नमाजचे पठण करण्यात आली. यामुळे सध्या राज्यात गोंधळाचे आणि धार्मिक ध्रुवीकरणाचे वातावरण असताना नाशिकमधून समतेचा नारा देण्यात आला आहे.

भोंग्याचे राजकारण थेट बुलडोझर मॉडेलवर

सध्या महाराष्ट्रात सुरू झालेले भोंग्यावरचे राजकारण हे देशात पसरले आहे. त्यातच भोंग्याचे राजकारण थेट बुलडोझर मॉडेलवर आले असून अतिक्रमण काढण्यासाठी ठराविक समाजाला टार्गेट केले जात असल्याची ओरड आहे. त्यातच बुलडोझर मॉडेल उत्तर प्रदेशमध्ये पुर्ण क्षमतेने वापरले जात असताना तो इतर राज्यांनाही आपलंस केलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली, हरियाणा आणि उत्तराखंडसह इतर राज्यात सध्या दोन समाजात दुही पहायला मिळत आहे. तर दोन समाज एकमेंकाच्या समोर येत आहेत. तसेच प्रशासनला समोरकरून राजकारणी एकाच समाजाला टार्गेट करून आपली पोळी भाजत आहेत.

होलीक्रॉस चर्चमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन

यादरम्यान महाराष्ट्रातील नाशिकमध्ये मात्र समाजविघातक घटनांना आणि बातम्यांना दूर करण्याचे काम सुरू आहे. येथे दोन समाजातील लोकांना एकत्र आणण्यासाठी तिसरा समाज पुढे आला आहे. नाशिकमध्ये सामाजिक सलोखा राखण्यासाठी होलीक्रॉस चर्चमध्ये मुस्लिम समाजातील लोकांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपवास सोडल्यानंतर (इफ्तारीनंतर) मुस्लिम समाजातील लोकांनी नमाज अदा केली.

नमाजही अदा केली

यावेळी येथे सर्व समाजातील धर्मगुरूंची व्यक्तीगत मत विचारात घेऊन इफ्तार पार्टीचे आयोजनाचा प्रस्ताव ठेवला होता अशी प्रतिक्रीया अजमल खान यांनी दिली. तसेच इथल्या चर्चमध्ये इफ्तार पार्टी आयोजित करण्याचेही ठरले होते. त्याप्रमाणे आम्ही ते आमंत्रण आनंदाने स्वीकारले. आणि तेथे नमाजही अदा केली असेही अजमल खान सांगितले.

इतर बातम्या :

Bhandara Crime | भंडाऱ्यात शेतमजुराची आत्महत्या; शेतातील आंब्याच्या झाडाला घेतला गळफास

Sanjay Raut on Devendra Fadnavis : अडीच वर्षापूर्वी तुम्हाला सुबुद्धी मिळाली असती तर मुख्यमंत्री असता; राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

आई होऊ न शकल्यानं महिला डॉक्टरची आत्महत्या! स्वतःच विषारी इंजेक्शन टोचून घेत जीव दिला

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.