AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संघाबद्दल चर्चा करायची असेल तर…मोहन भागवतांच्या दिल्लीतील भाषणाची चर्चा!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएस ही संघटना देशात नेहमीच चर्चेत असते. या संघटनेचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एकाद्या विषयावर भाष्य केल्यास त्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाते. दरम्यान, दिल्लीत बोलत असताना मोहन भागवत यांनी संघाविषयी असलेल्या धारणा आणि वस्तुस्थीती यावर भाष्य केले. संघाबद्दल चर्चा करायची असेल तर ती वस्तुस्थितीवर असायला हवी, असे मोहन भागवत म्हणाले.

संघाबद्दल चर्चा करायची असेल तर...मोहन भागवतांच्या दिल्लीतील भाषणाची चर्चा!
rss chief mohan bhagwat
| Updated on: Aug 26, 2025 | 7:55 PM
Share

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएस ही संघटना देशात नेहमीच चर्चेत असते. या संघटनेचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एकाद्या विषयावर भाष्य केल्यास त्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाते. दरम्यान, दिल्लीत बोलत असताना मोहन भागवत यांनी संघाविषयी असलेल्या धारणा आणि वस्तुस्थीती यावर भाष्य केले. संघाबद्दल चर्चा करायची असेल तर ती वस्तुस्थितीवर असायला हवी, असे मोहन भागवत म्हणाले. ते ‘100 वर्षांची संघाची यात्रा : नवे क्षितिज’ या विषयावर बोलत होते.

चर्चा अनेकदा अपुऱ्या माहितीच्या अधारावर असते

यावेळी बोलताना संघाबाबत वेगवेगळ्या चर्चा केल्या जातात. 2018 साली याच ठिकाणी एक कार्यक्रम झाला होता. संघाविषयी नेहमीच चर्चा केली जाते. मात्र ही चर्चा अनेकदा अपुऱ्या माहितीच्या अधारावर असते. त्यामुळेच संघाविषयी योग्य आणि खरी माहिती सांगणे गरजेचे आहे, असे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

संघाच्या बाबतीत कोणालाही पटवून सांगण्याची गरज नाही

पुढे बोलताना संघाविषयीची चर्चा ही धारणांवर नव्हे तर वस्तुस्थितीवर आधारलेली हवी. योग्य माहिती मिळाल्यानंतर श्रोत्यांनीच काय निष्कर्ष काढायचा आहे तो काढावा. संघाच्या बाबतीत कोणालाही पटवून सांगण्याची गरज नाही, असेही मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

आपल्या देशाचा जयजयकार झाला पाहिजे

सध्या संघाची 100 वर्षांची यात्रा चालू होत आहेत. ही यात्रा का होत आहे? संघ चालू राहावा यासाठी हे केले जात नाहीये. संघाचा एक उद्देश आहे. हा आपला देश आहे. आपल्या देशाचा जयजयकार झाला पाहिजे. आपल्या देशाला विश्वात स्थान मिळणे गरजेचे आहे. आपला देश अग्रभागी असायला हवा, अशा अपेक्षा यावेळी भागवत यांनी व्यक्त केल्या.

आपण भारताला हिंदू राष्ट्र म्हणतो म्हणजे…

भारत देश हाच संघ चालवण्याचे मुख्य कारण आहे. भारताला विश्वगुरू करण्यातच संघाची सार्थकता आहे. आपण कधीकाळी वैभवाच्या शिखरावर होतो. आपण स्वतंत्र होतो. आपल्यावर आक्रमण झाल्यानंतर आपण पारतंत्र्यात गेलो. दोन वेळा पारतंत्र्यातून गेल्यानंतर आता आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. पारतंत्र्यातून मुक्त होणे हेच आपले पहिले काम आहे, असेही मत यावेळी डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. आपण भारताला हिंदू राष्ट्र म्हणतो म्हणजे एखाद्याचा विरोध करतोय असे नाही, असेही यावेळी मोहन भागवत यांनी स्पष्ट केले.

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.