AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kashmir Murder : कश्मीरात दहशतवाद्यांचा हैदोस सुरूच; सरपंचाची गोळ्या झाडून केली हत्या

कश्मीर झोनच्या पोलिसांनी ट्विट करून या गोळीबाराच्या घटनेची माहिती दिली. सुरक्षा बलांच्या कारवाईच्या मोहिमेमुळे दहशतवादी चवताळले आहेत. याच रागातून त्यांनी ‘टार्गेट किलिंग’चे सत्र सुरू ठेवले आहे. दोन दिवसांपूर्वी राजपूत कुटुंबातील एका चालकाची हत्या केल्यानंतर शुक्रवारी बारामुल्ला जिल्ह्यात सरपंचाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Kashmir Murder : कश्मीरात दहशतवाद्यांचा हैदोस सुरूच; सरपंचाची गोळ्या झाडून केली हत्या
कुपवाडामध्ये अंमली पदार्थ आणि आयईडीसह 3 संशयितांना अटकImage Credit source: TV9
| Updated on: Apr 15, 2022 | 9:28 PM
Share

श्रीनगर : कश्मीर खोर्‍यात दहशतवादी प्रचंड सक्रीय झाले आहेत. सुरक्षा दलांनी विशेष मोहिम सुरू केल्यानंतर दहशतवाद्यांनी त्याचा बदला घेत टार्गेट किलिंग (Target Killing) सुरू केले आहे. मागील 15 दिवसांत सामान्य नागरिकांवर सहाव्यांदा हल्ला (Attack) करण्यात आला. त्यापाठोपाठ आज, शुक्रवारी आणखी एका स्थानिक नागरिकाला टार्गेट करण्यात आले. हा नागरिक बारामुल्ला जिल्ह्यातील गोशबुगस्थित पट्टण गावचा सरपंच आहे. दहशतवाद्यांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळ्या झाडल्या. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी जखमी सरपंचाला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मंजूर अहमद बांगरु असे या सरपंचाचे नाव आहे. दहशतवाद्यांनी काश्मीर खोर्‍यात लागोपाठ हल्ले सुरू ठेवल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Sarpanch shot dead by terrorists in Jammu and Kashmir)

दहशतवाद्यांकडून ‘टार्गेट किलिंग’चे सत्र

कश्मीर झोनच्या पोलिसांनी ट्विट करून या गोळीबाराच्या घटनेची माहिती दिली. सुरक्षा बलांच्या कारवाईच्या मोहिमेमुळे दहशतवादी चवताळले आहेत. याच रागातून त्यांनी ‘टार्गेट किलिंग’चे सत्र सुरू ठेवले आहे. दोन दिवसांपूर्वी राजपूत कुटुंबातील एका चालकाची हत्या केल्यानंतर शुक्रवारी बारामुल्ला जिल्ह्यात सरपंचाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. लागोपाठच्या हल्ल्यांमुळे काश्मीर खोर्‍यात दहशत वाढली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. बुधवारी कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सतीश कुमार नावाच्या चालकाची गोळ्या झाडून हत्या केली होती. काश्मीर खोर्‍यात लष्कराने दहशतवाद्यांवर कारवाईची मोहिम तीव्र केली आहे. त्यामुळे दहशतवाद्यांकडून हल्ले वाढले आहेत.

दक्षिण कश्मीरात नागरिकांवर हल्ल्यांचे सत्र वाढले

दक्षिण कश्मीरमध्ये नागरिकांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. या महिन्यात बिगर काश्मीरी मजूर आणि नागरिकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची ही सहावी घटना आहे. यात आठ जणांना टार्गेट केले आहे. 3 एप्रिलला पुलवामाच्या लिटर भागात पोल्ट्री वाहनाचा चालक, लोजुरा येथे बिहारचे 2 मजूर व शोपियाँच्या छोटीगाममध्ये काश्मिरी पंडितची हत्या करण्यात आली. तसेच 7 एप्रिलला पुलवाम्यात मजुराला गोळ्या झाडून जखमी केले होते. 13 एप्रिलला राजपूत कुटुंबातील चालकाची हत्या केली गेली. (Sarpanch shot dead by terrorists in Jammu and Kashmir)

इतर बातम्या

Nanded Murder : नांदेडमध्ये मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरुन तरुणाची हत्या

Gunratna Sadavarte wife: जयश्री पाटील नॉट रिचेबल! मुंबई पोलिसांकडून शोध घेण्याचे प्रयत्न सुरु

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.