वेब सीरीजपेक्षा भयानक स्टोरी, भाजपा नेत्याच्या घरात 7 महिन्यांचे बाळ 7 दिवसांनी असं सापडलं..

मिळालेल्या माहितीनुसार बाळ खरेदी करणारी भाजपा महिला नगरसेविका, तिचा पती आणि आठ जणांना या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवरुन ज्या व्यक्तीने हे बाळ चोरले होते, त्याचाही यात समावेश आहे. मथुरा रेल्वे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची माहिती दिली आहे.

वेब सीरीजपेक्षा भयानक स्टोरी, भाजपा नेत्याच्या घरात 7 महिन्यांचे बाळ 7 दिवसांनी असं सापडलं..
7 महिन्यांच्या बाळाचे अपहरणImage Credit source: TV 9 marathi
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 8:10 PM

मथुरा- रेल्वे स्टेशनवर सहा दिवसांपूर्वी चोरी झालेले सात महिन्यांचे बाळ (seven month child), चक्क एका भाजपाच्या महिला नगरसेविकेच्या (BJP corporator)घरी सापडले आहे. उ. प्रदेशात फिरोजाबादमध्ये (Firojabad)हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. भाजपाच्या नगरसेविका विनिता अग्रवाल आणि त्यांचे पती माजी सभापती कृष्ण मुरारी यांनी एका डॉक्टर दाम्पत्याकडून या बाळाची 1.8 लाख रुपयांत खरेदी केली होती. हे डॉक्टर दाम्पत्य एका मोठ्या टोळीचा एक भाग होते. भाजपाच्या नगरसेविकेला आणि तिच्या पतीला मुल हवे होते, त्यामुळे त्यांनी एका नर्सशी संपर्क साधला होता. त्या नर्सच्या माध्यमातून या बाळाला विकत घेण्यात आले होते.

भाजपा नगरसेविकेसह आठ जणांना अटक

मिळालेल्या माहितीनुसार बाळ खरेदी करणारी भाजपा महिला नगरसेविका, तिचा पती आणि आठ जणांना या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवरुन ज्या व्यक्तीने हे बाळ चोरले होते, त्याचाही यात समावेश आहे. मथुरा रेल्वे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची माहिती दिली आहे. या बाळाला त्याच्या आईकडे सोपवण्यात आले आहे. पोलिसांनी डॉक्टरकडून 500 रुपयांच्या नोटांचे बंडलही जप्त केले आहे.

टोळीत सहभागी असलेल्या डॉक्टरांचे हाथरसमध्ये हॉस्पिटल

या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, मुलांच्या तस्करीत सामील असलेल्या एका टोळीकडून या बाळाचे अपहरण करण्यात आले होते. दीप कुमार असे बाळ चोरलेल्या व्यक्तीचे नाव होते. तो या टोळीतील एक सदस्य होता. या टोळीत दोन डॉक्टरांचाही समावेश होता. शेजारचा जिल्हा असलेल्या हाथरसमध्ये ते हॉस्पिटल चालवतात. यासह इतरही काही आरोग्य कार्यकर्ते यात सहभागी असल्याचे समोर आले. या सगळ्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर लहान बाळाची सुखरुप सुटका करण्यात आली. मुल हवे होते, यासाठी भाजपा नगरसेविका आणि तिच्या पतीने हे मुल खरेदी केले होते. या दाम्पत्याला आधी एक मुलगीही आहे, तरीही त्यांना मुलगा हवे असल्याने त्यांनी हा प्रताप केल्याचे समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा

सीसीटीव्हीत संपूर्ण प्रकार बंदिस्त

हा बाळ चोरी जाण्याचा प्रकार मथुरा रेल्वे स्टेशनवर घडला. सहा दिवसांपूर्वी 23 ऑगस्टच्या रात्री आई-वडलांसह एक सात महिन्यांचे बाळ झोपले होते. त्याचवेळी मध्यरात्री एक माणूस तिथून जात होता. त्यानंतर तो परतला आणि त्याने बाळावर पाणी टाकत, त्याला उचलून तो पळू लागला. प्लॅटफ़र्मवर उभ्या असलेल्या ट्रेनकडे धावत असताना ही व्यक्ती सीसीटीव्हीत कैद झाली होती. या सगळ्या प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आली असली तरी अद्याप भाजपाकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Non Stop LIVE Update
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.