AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: त्रिपुरात कोरोना नियम तोडणाऱ्या पुजाऱ्याच्या कानशीलात लगावली, कारवाई करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना पदावरुन हटवलं

पश्चिम त्रिपुराचे जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव यांना कोरोनाचं उल्लंघन करणाऱ्या लग्न समारंभावर कडक कारवाई केल्याबद्दल थेट पदावरुनच हटवलं आहे.

VIDEO: त्रिपुरात कोरोना नियम तोडणाऱ्या पुजाऱ्याच्या कानशीलात लगावली, कारवाई करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना पदावरुन हटवलं
| Updated on: May 04, 2021 | 3:54 AM
Share

आगरताळा : पश्चिम त्रिपुराचे जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव यांना कोरोनाचं उल्लंघन करणाऱ्या लग्न समारंभावर कडक कारवाई केल्याबद्दल थेट पदावरुनच हटवलं आहे. आयसीयूतील कोरोना रुग्णांची स्थिती पाहून परतत असताना काही ठिकाणी लग्न समारंभ होत असल्याचं पाहिल्यावर संतापलेल्या शैलेश कुमार यांनी आक्रमक पवित्रा घेत कारवाई केली. यावेळी त्यांनी एका पुजाऱ्याच्याही कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर भाजप आमदार आशिष दास यांनी त्यांना हटवण्याची मागणी केली. आता त्रिपुरा सरकारने त्यांना पश्चिम त्रिपुरा जिल्हाधिकारी पदावरुन हटवलं आहे (Shailendra Kumar Yadav removed from DM for slapping priest for violation of covid protocol in Tripura).

कारवाई दरम्यान शैलेश कुमार यांनी लग्नातील वऱ्हाडींशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आलाय. त्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला. त्यानंतर मुख्यमंत्री विप्लव देव यांच्या हस्तक्षेपाने यादवांवर कारवाई करण्यात आली. आयएएस अधिकारी शैलेश यादव यांच्याविरोधात भाजप आमदारांनीही निदर्शनं केली होती.

माफीनाम्यानंतरही निलंबनाची कारवाई

पश्चिम त्रिपुरातील लग्न समारंभात जाऊन आगरतळ्याचे जिल्हाधिकारी शैलेश यादव यांनी वधू-वरासह पाहुण्यांनाही हुसकावून लावलं होतं. या घटनेचा व्हिडीओ झाल्यानंतर काही जणांनी त्यांच्या दबंग कारवाईचं कौतुक केलं होतं, मात्र त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकाही केली. त्यामुळे शैलेश यादव यांनी माफीही मागितली होती. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. परंतु अखेर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली.

एकीकडे अनेक कोरोनाग्रस्त रुग्ण आयसीयूत दाखल आहेत, तर दुसरीकडे काही मंगल कार्यालय चालक जिल्हा प्रशासनाचे नियम धुडकावून मनमानी पद्धतीने लग्न समारंभ करत असल्याचं जिल्हाधिकारी यादव यांच्या लक्षात आलं. त्यांनी पोलिसांना कारवाई करण्यास सांगितलं. मात्र, पोलीसही टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरं देत होते. त्यामुळे या लग्न सोहळ्यांना पोलिसांचंही अभय असल्याचं त्यांच्या ध्यानात आलं. त्यामुळे नागरिक आणि पोलिसांचं बेजबाबदार वर्तन पाहून संतापलेले जिल्हाधिकारी शैलेश यादव स्वतःच मैदानात उतरले.

नेमकं प्रकरण काय?

एका रुग्णालयातून जिल्हाधिकारी शैलेश यादव यांना आयसीयू बेडमध्ये काही तांत्रिक दोष असल्याची तक्रार आली. त्यावेळी त्यांनी स्वतः तेथे जाऊन पाहणी केली आणि त्यावर उपाययोजनांचे आदेश दिले. आयसीयूतील रुग्णांची स्थिती पाहिल्यानंतर त्यांनी शहरातील स्थिती कशी आहे हे पाहण्याचा निर्णय घेतला. रस्त्याने जाताना त्यांना मंगल कार्यालयांमध्ये नियमांचं उल्लंघन करत लग्न सोहळे होत असताना दिसले. 10 वाजल्यानंतर कोणतेही मंगल कार्यालय सुरु ठेवण्यास परवानगी नव्हती. तरीही ही मंगल कार्यालये सुरुच होती. शिवाय कमी लोकांना परवानगी असताना लग्नात मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. अनेक जणांनी मास्कही घातलेला नव्हता.

एकूणच कायद्याचं उल्लंघन आणि त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका हे सर्व पाहून संतापलेल्या जिल्हाधिकारी शैलेश यादव यांनी स्वतः मंगल कार्यालयात जाऊन कारवाईला सुरुवात केली. मास्क न घातलेल्या वऱ्हाडींना थेट दंडुक्याचा प्रसाद देण्यात आला, तर नियम तोडूनही आम्ही काहीच चुकीचं केलं नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना थेट अटक करण्यात आली. (Tripura DM Shailesh Yadav suspended)

नियम मोडणाऱ्या पुजाऱ्याच्या कानशिलात

संतापलेल्या जिल्हाधिकारी शैलेश यादव यांनी प्रशासन आलेलं असतानाही आपल्याच धुंदीत असलेल्या वऱ्हाड्यांना थेट चोपण्याचे आदेश दिले. पोलीस यंत्रणा वरवरची कारवाई करताना पाहून त्यांनी स्वतः पुढे होऊन कारवाई करण्यास सुरवात केली. यावेळी एका लग्नात तर त्यांनी नियम मोडणाऱ्या पुजाऱ्याच्या कानशिलातही लगावली.

पाहा व्हिडीओ :

 हेही वाचा :

Video: जेव्हा कलेक्टरनं लग्नात घुसून वऱ्हाडींची वरात काढली, बघा काय काय घडलं?

DM Shailesh Yadav | लग्नात घुसून वऱ्हाडींची वरात, टीकेनंतर कलेक्टर शैलेश यादवचं निलंबन

हत्या, बलात्काराच्या आरोपात जामीन मिळाल्यानंतर पुन्हा 75 वर्षीय वृद्धेवर बलात्कार, नराधमाला बेड्या

Shailendra Kumar Yadav removed from DM for slapping priest for violation of covid protocol in Tripura

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.