शरद पवारांवर हल्ला करणारा आठ वर्षांनी अटकेत

2011 मध्ये शरद पवारांना चपराक लगावल्यानंतर आरोपी अरविंदर सिंह धारदार शस्त्राने हल्ला करण्याच्या तयारीत होता.

शरद पवारांवर हल्ला करणारा आठ वर्षांनी अटकेत

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तब्बल आठ वर्षानंतर अटक करण्यात आली आहे. आरोपी हरविंदर सिंगला (उर्फ अरविंदर सिंह) पोलिसांनी दिल्लीमधून अटक केली. 2011 मध्ये पवारांना चपराक लगावल्यानंतर तो धारदार शस्त्राने हल्ला करण्याच्या तयारीत (Sharad Pawar’s Attacker Arrested) होता.

दिल्लीतील कोर्टाने हरविंदरला 2014 मध्ये गुन्हेगार घोषित केलं होतं. दरम्यानच्या काळात अरविंदर फरार झाला होता. दिल्लीमध्ये ट्रान्सपोर्टर म्हणून काम करणाऱ्या हरविंदरने महागाई आणि भ्रष्टाचाराला वैतागून तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर नियोजनपूर्वक हल्ला केल्याची कबुली दिली होती.

हरविंदरने शरद पवार यांच्या चेहऱ्यावर जोरदार चपराक लगावली होती. त्यानंतर आपल्याकडील धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत तो होता. सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून त्याला शरद पवारांपासून दूर ढकललं होतं. त्यामुळे सुदैवाने पवारांना गंभीर दुखापत झाली नव्हती.

या प्रकरणाला जास्त महत्व देण्याची गरज नसल्याचं शरद पवार त्यावेळी म्हणाले होते. ‘पत्रकारांमध्येच धक्काबुक्की झाल्याचं सुरुवातीला मला वाटलं. मी ठीक असून कोणतीही गंभीर इजा झालेली नाही’ असं पवार म्हणाले होते.

प्रसिद्धीच्या हेतूने हा पब्लिसिटी स्टंट घडवून आणल्याचा आरोप त्यावेळी भाजपच्या काही नेत्यांनी केला होता. भाजप नेत्यांनीही ही घटनेला गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचं (Sharad Pawar’s Attacker Arrested) वक्तव्य केलं होतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *