श्रद्धाची हत्या, दुसरीशी शरीरसंबंध, तिसरीला अडकवण्याचा प्लान! मारेकरी आफताब सायको किलर?

श्रद्धा हत्याकांड प्रकरणातील आरोपी आणि श्रद्धाचा प्रियकर आफताब पुनावाला याने किती जणींना जाळ्यात अडकवलं?

श्रद्धाची हत्या, दुसरीशी शरीरसंबंध, तिसरीला अडकवण्याचा प्लान! मारेकरी आफताब सायको किलर?
धक्कादायक...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 15, 2022 | 2:47 PM

श्रद्धा हत्याकांड प्रकरणी (Shraddha Murder Case) सनसनाटी माहिती समोर आलीय. प्रेयसी श्रद्धाची हत्या (Murder Mystery) करणाऱ्या प्रियकर आफताबने (Shraddha Aftab News) केलेलं कृत्य हादरवून टाकणारं होतंच. पण यानंतर त्याने जे केलं, ते त्याही पेक्षा भयंकर होतं. श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने आपल्या पहिल्या प्रेयसीला घरी बोलावलं. दिवसभर तो तिच्यासोबतच होत्या. त्या रात्री दोघांनी एकमेकांसोबत लैंगिक संबंधही ठेवल्याचं समोर आलंय.

विशेष म्हणजे यापुढे आफताब तिसऱ्या मुलीलाही आपल्या जाळ्यात अडकवण्याच्या प्रयत्नात होता, अशी माहिती समोर आलीय. त्यामुळे आफताब हा सायको किलर तर नाही ना? त्याने आपल्या जाळ्यात आणखी किती मुलींना अडकवलंय? याचाही तपास पोलीस करणार आहेत.

मुंबईत कॉल सेंटरमध्ये श्रद्धासोबत प्रेमसंबंध ठेवणारा आफताब तिला घेऊन दिल्लीत गेला. श्रद्धाच्या कुटुंबीयांनी त्यांच्या नात्याला विरोध केला होता. त्यामुळे श्रद्धा आणि आफताब लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, श्रद्धासोबत प्रेमसंबंध जडण्याआधी आफताब एका डेटिंग ऍपवर बराच सक्रिय होता. या डेटिंग ऍपवर त्याची ओळख एका सायकॉलॉसिट्स मुलीशी झाली होती. ही मुलगी दिल्लीतलीच होती.

पण नंतर श्रद्धाशी संबंध जुळल्यानंतर सायकॉलॉजीस्ट मुलीशी आफताबचा संपर्क कमी झाला होता. घरच्यांचा विरोध डावलून श्रद्धा आफताबसोबत दिल्लीला आली. पण तिथे ती लग्नाचा लावत असल्यानं आफताबने गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर तिच्या शरीराचे तब्बल 35 तुकडे करुन वेगवेगळ्या ठिकाणी फेकले.

श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबला आपली पहिली प्रेयसी वाटलेली दिल्लीतली सायकॉलॉजिस्ट मुलगी आठवली. तिच्याशी तिने पुन्हा चॅटिंग सुरु केलं. एक दिवस तिला घरी बोलावलं.

ज्या घरात श्रद्धाची आफताबने हत्या केली, त्याच घरात दिवसभर ती मुलगी आणि आफताब एकत्र होते. त्या रात्री दोघांनी एकमेकांशी शरीरसंबंध देखील ठेवल्याची माहिती समोर आलीय.

पण आफताब इथवरच थांबला नाही. दरम्यानच्या काळात तो तिसऱ्या एका मुलीला आपल्या जाळ्यात ओढण्याच्या पूर्ण तयारीत होता. त्याने एका दिल्लीत तिसऱ्या मुलीला आपल्या प्रभावाखाली आणलंही होतं.

फक्त एकमेकांचे मोबाईल नंबर एक्सचेंज करणं बाकी होतं, असंही पोलिसांच्या तपासातून समोर आलंय. आफताब या मुलीलाही घरी येण्याची ऑफर दिली होती, अशी माहिती समोर आलीय.

दिल्ली पोलिसांच्या एका पथकाने या हत्याकांड प्रकरणी आरोपी आफताब पुनावाला यांच्या मोबाईलमधील डेटा तपासण्यास सुरुवात केलीय. त्यातील चॅटमधून धक्कादायक खुलासे होऊ लागलेत.

आफताबने आपल्या जाळ्यात डेटिंग ऍपच्या माध्यमातून किती मुलींना फसवलं? कोणकोणत्या मुलींना आपल्या जाळ्यात ओढलं? या सगळ्याचा छडा लावण्याचंही आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलंय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.