हत्येच्या चार महिन्यांनी आफताबने श्रद्धाचा चेहरा बर्नरने जाळला, आरोपपत्रातून धक्कादायक माहिती

श्रद्धाच्या हत्येनंतर छतरपूर येथील एका दुकानातून आफताबने फ्रीज विकत घेतला. त्यासाठी सिटी बँकेच्या क्रेडिट कार्डमधून 25 हजार रुपये दिले. दुकानदाराने 19 मे रोजी सायंकाळीच फ्रिज घरी पाठवला

हत्येच्या चार महिन्यांनी आफताबने श्रद्धाचा चेहरा बर्नरने जाळला, आरोपपत्रातून धक्कादायक माहिती
श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावालाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 9:51 AM

मुंबई : वसईतील श्रद्धा वालकर (Shraddha Walkar Murder News) या तरुणीच्या दिल्लीत (Delhi Murder Case) झालेल्या हत्या प्रकरणाचा पोलिसांचा तपास पुर्ण झाला आहे. श्रद्धा हत्याकांडप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 6 हजार 629 पानांचे आरोपपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या आरोपपत्रात नार्को टेस्ट, पॉलीग्राफी आणि डीएनए टेस्टचा अहवालही समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच 150 पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाबही नोंदवले आहेत. आरोपपत्रात श्रद्धाच्या हत्येचे अनेक खुलासे करण्यात आले आहे. 18 मे रोजी श्रद्धा वालकर या तरुणीची तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पुनावाला (Aftab Poonawala) याने हत्या केली होती. आफताबने हत्येची कबुलीही दिली आहे.

आधी फ्रीज घेतला

श्रद्धाच्या हत्येनंतर छतरपूर येथील एका दुकानातून आफताबने फ्रीज विकत घेतला. त्यासाठी सिटी बँकेच्या क्रेडिट कार्डमधून 25 हजार रुपये दिले. दुकानदाराने 19 मे रोजी सायंकाळीच फ्रिज घरी पाठवला. फ्रिज आल्यानंतर आफताबने सायंकाळीच श्रद्धाचे दोन्ही पाय घोट्यापासून कापले आणि फ्रिजमध्ये ठेवले.

हे सुद्धा वाचा

चेहरा जाळला

आफताब पूनावालाने  श्रद्धा वालकरची हत्या केल्यानंतर तिचा चेहरा आणि डोके विकृत करण्यासाठी ब्लो टॉर्च म्हणजेच बर्नरचा वापर केला होता. श्रद्धाचा खून करुन चार महिने झाले होते. मात्र श्रद्धाचे डोके, धड आणि हात फ्रिजमध्येच ठेवले होते. कारण ते फेकले असते तर हत्येचा सुगावा लागला असता. तब्बल चार महिन्यांनी म्हणजे सप्टेंबर २०२२ मध्ये त्याने श्रध्दाचे डोके आणि चेहरा ब्लो टॉर्चने जाळून खराब करण्याचा प्रयत्न केला. तिचे केस कापले. तिची हाडे ग्राइंडिंग मशीनमध्ये दळणे असे प्रकार त्याने केले.

रोज श्रद्धाचा चेहरा पाहायचा

18 मे रोजी श्रद्धाची हत्या केल्यानंतर, पुढील चार महिने श्रद्धाचे डोके आणि चेहरा फ्रीजरमध्ये ठेवण्यात आला होता.फ्रीज उघडताना त्याला अनेकदा श्रद्धाचा चेहरा दिसायचा. तो तिला रोज बघायचा.

श्रद्धाचा मोबाईल मुंबईत फेकला गेला

श्रद्धाचा फोन सतत आफताबसोबत असायचा. श्रद्धाच्या फोनवर येणाऱ्या प्रत्येक मेसेजला तो स्वत: श्रद्धा म्हणून रिप्लाय देत होता. श्रद्धाचा मोबाईल तो दिल्लीहून मुंबईला घेऊन गेला. मुंबईत चालत्या ट्रेनमधून मीरा भाईंदरच्या खाडीत फेकून दिला.

पोलिसांनी 150 साक्षीदार तपासले

सहपोलिस आयुक्त मीनू चौधरी यांनी सांगितले की, पोलिसांनी हा खटला मजबूत करण्यासाठी 150 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. पूनावालावर भारतीय दंड संहिताच्या कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपपत्रानुसार, मेहरौली पोलिस स्टेशनला महाराष्ट्र पोलिसांकडून श्रद्धा वालकर हरवल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर मेहरौली पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. त्यात श्रद्धाच्या वडिलांची चौकशी करण्यात आली.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.