Snake plant : घरात स्नेक प्लांट लावलं तर काय होतं? अनेकांना माहीत नाही हे सत्य
स्नेक प्लांट या वनस्पतीबद्दल अनेक समज गौरसमज आहेत. स्नेक प्लांट घरात लावल्यास नक्की काय होतं? त्याचे फायदे तोटे काय आहेत? हे जाणून घेऊयात.

स्नेक प्लांट ही एक विशिष्ट प्रकारची वनस्पती आहे. वास्तुशास्त्रामध्ये तुमचं घर कसं असावं याबद्दल जसं मार्गदर्शन करण्यात आलं आहे, त्याचप्रमाणे तुमच्या घरात कोणत्या वनस्पती असाव्यात आणि कोणत्या असू नयेत? याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आलं आहे. अशा अनेक वनस्पती आहेत, ज्या घरात असणं शुभ मानलं गेलं आहे. त्यामध्ये मनी प्लांट, लकी बाम्बू अशा अनेक वनस्पती आहेत, त्या जर तुमच्या घरात असतील तर तुमच्या घरात सुख शांती येते, समृद्धी येते अशी मान्यता आहे.
त्याचप्रमाणे स्नेक प्लांट ही देखील वनस्पती अतिशय शुभ मानली जाते. वास्तुशास्त्रामध्ये तर स्नेक प्लांटचे अनेक फायदे सांगितले आहेत. स्नेक प्लांट ज्या घरामध्ये असंत त्या घरात वादविवाद आणि भांडणं होत नाहीत असं वास्तुशास्त्र सांगतं. ज्या घरात स्नेक प्लांट आहे, तेथील नकारात्मक ऊर्ज नष्ट होऊन घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते. स्नेक प्लांटमुळे तुम्हाला व्यावसाय आणि नोकरीत देखील चांगलं यश मिळतं असं वास्तुशास्त्र सांगतं. हे झाले वास्तुशास्त्राचे फायदे. मात्र घरात स्नेक प्लांट लावण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
हवा शुद्ध राहाते – स्नेक प्लांट ही अशी वनस्पती आहे, जी वनस्पती दिवसापण आणि रात्रीपण दोन्ही वेळेला ऑक्सिजनचा पुरवठा करते. त्यामुळे जर घराचे दारं खिडक्या बंद असतील तर अशा वेळेला घरात स्नेक प्लांट असणं फायद्याचं ठरतं.
हवेतून कार्बनडायऑक्साईड शोषून घेते – स्नेक प्लांट ही अशी वनस्पती आहे, जी हवेतील कार्बनडायऑक्साईड आणि इतर विषारी घटक शोषून घेते, त्यामुळे तुमच्या घरातील हवा शुद्ध राहाते. हवेची गुणवत्ता सुधारते आणि आजारपणाचा धोका कमी होतो.
नकारात्मक ऊर्जा नष्ट करते – ज्या घरात स्नेक प्लांट आहे, अशा घरामध्ये नकारात्मक ऊर्ज नसते. घरामध्ये नेहमी सकारात्म ऊर्जा तयार होते. ज्याचा फायदा तुम्हाला तुमचं घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी होतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
