साप पुन्हा तुमच्या घरात कधीच येणार नाही, घरच्या घरी करा हा नारळाचा सोपा उपाय
पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप मानवी वस्तीमध्ये घुसण्याचं प्रमाण वाढतं. साप घरात येऊ नयेत, यासाठी आज आपण एका खास आणि स्वस्त उपायाची माहिती घेणार आहोत.

पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप मानवी वस्तीमध्ये घुसण्याचं प्रमाण वाढतं. इतर ऋंतुमध्ये साप हे बिळात लपून बसतात, मात्र पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बिळांमध्ये पाणी शिरल्यानं साप वर येतात, आणि ते आपल्यासाठी कोरडी जागा शोधण्याच्या प्रयत्नात असतात. अशा स्थितीमध्ये अनेकदा ते आपल्या घरात प्रवेश करतात आणि अडगळीच्या ठिकाणी लपून बसतात. त्यामुळे पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होते.
घरात साप घुसण्याच्या घटना या ग्रामीण भागांमध्येच नाही तर शहरी भागांमध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात घडत आहे, जर तुमच्या घराच्या आसपास एखादा नाला, मोकळी जागा किंवा उद्यान असेल तर अशा स्थितीमध्ये घरात साप घुसण्याचा धोका आणखी वाढतो. साप आपल्या घरात येऊ नये, यासाठी लोक विविध उपाय करतात, ज्यामध्ये काही लोक वेगवेगळ्या केमिकलची मदत घेतात तर काही लोक वेगवेगळे झाडं देखील घरात लावतात. मात्र आज आम्ही तुम्हाला असा एक सोपा उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला घरात न झाडं लावण्याची गरज आहे, ना केमिकलचा वापर करण्याची गरज, मात्र या उपायामुळे पुन्हा कधीच साप तुमच्या घरात प्रवेश करणार नाही.
काय आहे उपाय?
आज आम्ही तुम्हाला जो उपाय सांगणार आहोत, त्यासाठी तुम्हाला फार काही खर्च करण्याची गरज नाही, किंवा त्यासाठी कुठे जाण्याची देखील गरज नाही, तुम्ही घरच्या घरी हा उपाय करू शकता. सुकलेल्या नारळाचं जे वरचं कवच असतं ज्याला आपण नारळाच्या शेंड्या देखील म्हणतो, ते आवरण किंवा शेंड्या अशा जागी ठेवा जिथून तुम्हाला वाटंत तुमच्या घरात साप येऊ शकतो. नारळाचं हे जे आवरण असतं त्याला विशिष्ट प्रकारचा वास असतो, या वासामुळे साप तुमच्या घरात प्रवेश करत नाही, तसेच नारळाच्या शेंड्यांवरून जाताना साप घसरतो, त्याला पुढे जाता येत नाही, त्यामुळे तो तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही, आणि तुमचा सापांपासून बचाव होईल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
