AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलावंसं वाटतं, महिला खासदारावर आझम खान यांचं वक्तव्य

तुम्ही (Rama Devi) खुप सुंदर दिसता, एवढ्या सुंदर आहात की तुमच्या डोळ्यात डोळे घालून तुमच्याशी बोलावं वाटतं, असं वक्तव्य आझम खान (Azam Khan) यांनी केलं. यानंतर भाजपच्या खासदारांनी (BJP MPs) एकच गोंधळ केला.

तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलावंसं वाटतं, महिला खासदारावर आझम खान यांचं वक्तव्य
| Edited By: | Updated on: Jul 26, 2019 | 9:21 AM
Share

नवी दिल्ली : बेताल वक्तव्यांसाठी समाजवादी पक्षाचे कुप्रसिद्ध खासदार आझम खान (Azam Khan) यांची पुन्हा एकदा जीभ घसरली. यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्ष म्हणून काम पाहत असलेल्या भाजप खासदार रमा देवी (Rama Devi) यांच्यावर वक्तव्य केलं. तुम्ही (Rama Devi) खुप सुंदर दिसता, एवढ्या सुंदर आहात की तुमच्या डोळ्यात डोळे घालून तुमच्याशी बोलावं वाटतं, असं वक्तव्य आझम खान (Azam Khan) यांनी केलं. यानंतर भाजपच्या खासदारांनी (BJP MPs) एकच गोंधळ केला.

लोकसभेत ट्रिपल तलाकवर चर्चा सुरु असताना समाजवादी पक्षाच्या वतीने आझम खान यांना संधी देण्यात आली होती. आझम खान यांनी तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहात, असं म्हणत सावरण्याचाही प्रयत्न केला. पण केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी या वक्तव्याचा निषेध करत माफीची मागणी केली.

https://twitter.com/GovindRajvansi/status/1154341966286483457

भाजपच्या खासदारांनीही यानंतर गोंधळ केला. पण विशेष म्हणजे सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आझम खान यांचं समर्थन केलं. आझम खान यांचा लोकसभा अध्यक्षांचा अनादर करण्याचा कोणताही हेतू नव्हता, हे भाजपवालेच उद्धट आहेत, असं प्रत्युत्तर अखिलेश यादव यांनी दिलं.

नेमकं काय घडलं?

आझम खान संसदेत बोलत असताना त्यांनी एका शेरच्या माध्यामातून आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला. आझम खान सत्ताधाऱ्यांकडे पाहून ‘तु इधर उधर की न बात कर, ये बता की काफिला क्यु लुटा’ असं म्हटल्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या खासदार रमा देवी यांनीही त्यांना मिश्किलपणे तुम्ही इकडे तिकडे न पाहता माझ्याकडे पाहून बोला असं म्हटलं. त्यानंतर संसदेत एकच हशा पिकला.

यावर उत्तर देताना आझम खान यांची चीभ घसरली. आझम खान म्हणाले, “मला तर तुमच्याकडे इतकं पाहावंसं वाटतं की तुम्ही म्हणाल नजर हटवा.  मला तुम्ही इतक्या चांगल्या आणि सुंदर वाटतात की तुमच्या डोळ्यात डोळे घालून तुमच्याशी बोलत रहावंसं वाटतं.” यावर खासदार रमादेवी यांनी देखील हजरजबाबीपणे मी तुमची छोटी बहिण असल्याने तुम्हाला असं वाटत असल्याचे उत्तर दिले. यानंतर सत्ताधारी पक्षातील खासदारांनी आझम खान यांच्या या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या माफीची मागणी केली.

दरम्यान, आझम खान यांनी बेताल वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रतिस्पर्धी उमेदवार जया प्रदा यांच्यावरही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.