AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चोचीत भरतो 11 लीटर पाणी, 50 किमीचा वेग, हा दुर्लभ पक्षी प्रथमच या भागात दिसला

spot-billed pelican: भारत आणि श्रीलंकेपासून दक्षिण पूर्व आशिया, कंबोडिया, लाओस, थायलॅड आणि व्हिएतनाममध्ये हा पक्षी मिळतो. हा पक्षी नदी, सरोवर, धबधबे आणि दलदल असणाऱ्या भागात राहतो. या पक्षीचे मास, पंख आणि चोचीसाठी त्याची शिकार केली जाते.

चोचीत भरतो 11 लीटर पाणी, 50 किमीचा वेग, हा दुर्लभ पक्षी प्रथमच या भागात दिसला
स्पॉट बिल्ड पेलिकन
| Updated on: Nov 16, 2024 | 10:00 AM
Share

निसर्गात अनेक प्राणी आणि पक्षी आहे. काही प्राणी अन् पक्षी दुर्लक्ष झाले आहे. काही नामशेषसुद्धा झाले आहे. चोचीत 11 लीटर पाणी भरणारा आणि 50 किमीच्या वेगाने उडणारा पक्षी नुकताच दिसला आहे. झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यात हा पक्षी दिसला आहे. दुर्लक्ष असणारा स्पॉट बिल्ड पेलिकन पक्षी वनविभागातील कर्मचाऱ्यांना दिसला. नामेशष होण्याचा मार्गावर असणारा हा पक्षी भारतातील गुजरात, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात राहिला आहे.

असे आहे स्पॉट बिल्ड पेलिकन पक्षीचे वैशिष्ट्ये

स्पॉट बिल्ड पेलिकन हा एक मांसाहारी पक्षी आहे. मासे आणि लहान जलचर प्राण्यांना तो खातो. मासे पकडण्यासाठी तो त्याची लांब चोच वापरतो. त्याच्या चोचीच्या खाली एक थैली असते. त्यात 11 लीटर पाणी साठवता येते. या पक्षाच्या उडण्याचा वेग कमालीचा आहे. ताशी 50 किमी प्रतितास वेगाने तो उडू शकतो.

पेलिकन पक्ष्याची गणना मोठ्या पक्षीमध्ये होते. त्यांची लांबी 125 ते 150 सेमी आणि पंख 2.5 मीटर असतात. त्याचे वजन 4 ते 6 किलोग्रॅम असते. त्याचे पंख पांढरे असतात. त्याच्या डोक्यावर तपकिरी-काळ्या रंगाचा मुकुटासारखा दिसणारे चिन्ह असते. कपाळावर एक विशिष्ट पिवळ्या रंगाचे चिन्ह देखील आहे.

या ठिकाणी अधिवास

आशिया खंडातील दलदलीच्या भागात हा पक्ष आढळतो. त्याच्या चोचीवर काही ठिपके असतात. सध्या पेलिकन नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. हे आययूसीएनच्या रेड लिस्टमध्ये ‘निअर एन्डेंजर्ड’ म्हणून सूचीबद्ध आहे. सतत कमी होत असलेला पेलिकन पक्ष्याचा अधिवास शिकार आणि प्रदूषणामुळे कमी होत आहे.

भारत आणि श्रीलंकेपासून दक्षिण पूर्व आशिया, कंबोडिया, लाओस, थायलॅड आणि व्हिएतनाममध्ये हा पक्षी मिळतो. हा पक्षी नदी, सरोवर, धबधबे आणि दलदल असणाऱ्या भागात राहतो. या पक्षीचे मास, पंख आणि चोचीसाठी त्याची शिकार केली जाते. तसेच वाढत्या प्रदूषणामुळे त्याचा अधिवास धोक्यात आला आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.