AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Awas Yojana-Urban: मोदी सरकारची मध्यमवर्गीयांना भेट, 8 लाखांचे गृहकर्ज, 4 टक्के अनुदान… काय आहे नेमकी योजना

Pradhan Mantri Awas Yojana Update: गृहकर्ज योजनेत ₹35 लाखपर्यंतच्या घरावर ₹25 लाख रुपये कर्ज घेणाऱ्यांना लाभ दिला जातो. या लाभार्थींना 12 वर्षांसाठी पहिल्या 8 लाख रुपयांच्या कर्जावर 4 टक्के अनुदान (सबसिडी) दिले जाते. लाभार्थ्यांना 5 वर्षांच्या कालावधीत हप्त्यांमध्ये पुश बटणाद्वारे 1.80 लाख रुपये अनुदान मिळेल.

PM Awas Yojana-Urban: मोदी सरकारची मध्यमवर्गीयांना भेट, 8 लाखांचे गृहकर्ज, 4 टक्के अनुदान... काय आहे नेमकी योजना
Pradhan Mantri Awas Yojana
| Updated on: Nov 16, 2024 | 10:03 AM
Share

PM Awas Yojana-Urban: स्वत:चे घर व्हावे, असे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी सर्वसामान्य आयुष्यभराची पुंजी एकत्र करतात. सर्वसामान्यांना घर घेणे सोपे व्हावे, यासाठी सरकारने एक योजना आणली आहे. मोदी सरकारने नुकतीच पंतप्रधान आवास योजना शहरी (पीएमएवाई-यू) 2.0 मंजुरी दिली आहे. या योजनेचा फायदा गरीबाप्रमाणे मध्यमवर्गीयांना होणार आहे. या योजनेच्या व्याप्तीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग (EWS), निम्न उत्पन्न गट (LIG), मध्यम उत्पन्न गट (MIG) कुटुंबांचा समावेश आहे.

चार प्रकारच्या घटकांना मदत

पंतप्रधान आवास योजना शहरीत घर बनवण्यासाठी अनुदानात कर्ज दिले आहे. या योजनेत एक कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत दिली गेली आहे. या योजनेअंतर्गत ₹2.30 लाख कोटींची सरकारी मदत दिली जाते. या योजनेत चार प्रकारचे घटक आहेत. यामध्ये लाभार्थी आधारित बांधकाम (BLC), भागीदारीतील परवडणारी घरे (AHP), परवडणारी भाडे गृहनिर्माण (ARH) आणि व्याज अनुदान योजना (ISS) यांचा समावेश आहे.

गृहकर्ज योजनेत असा मिळतो लाभ

गृहकर्ज योजनेत ₹35 लाखपर्यंतच्या घरावर ₹25 लाख रुपये कर्ज घेणाऱ्यांना लाभ दिला जातो. या लाभार्थींना 12 वर्षांसाठी पहिल्या 8 लाख रुपयांच्या कर्जावर 4 टक्के अनुदान (सबसिडी) दिले जाते. लाभार्थ्यांना 5 वर्षांच्या कालावधीत हप्त्यांमध्ये पुश बटणाद्वारे 1.80 लाख रुपये अनुदान मिळेल.

तुम्ही घरी बसूनही प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला पीएम आवास योजनेच्या (PMAYMIS) अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेत मिळणारे कर्जाचे अनुदान कर्जदाराच्या कर्ज खात्यात जमा केले जाते. त्यामुळे त्यांचा ईएमआय कमी होतो. परंतु सबसिडी काढून घेतल्यास कर्जदाराचा ईएमआय वाढू शकतो. सबसिडी संपल्यावर कर्जदाराला मूळ व्याजदर परत गृहकर्ज घ्यावे लागते, ज्यामुळे ईएमआय वाढतो.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.