AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदि शंकराचार्यांएवढंच रामानुजाचार्यांचं कार्य अद्भभूत; ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ पाहिल्यावर मनाला शांती मिळते : अमित शहा

'संतांचा स्वभाव असतो सुक्ष्म लोकांचं गुणगाण गाऊन मोठं करणं. मी आज चेतना आणि उत्साह घेऊन पुढे जाणार आहे. ज्यांच्यात संवेदना असते धर्म आणि समाजासाठी काही करायची तळमळ असते, इच्छा असते अशा लोकांना काम करण्याची चेतना आणि उत्साह जीयरास्वामी देत आहेत. तुम्ही रामानुजाचार्यांच्या स्मारकातून हीच प्रेरणा मिळेल', असंही शाह यावेळी म्हणाले.

आदि शंकराचार्यांएवढंच रामानुजाचार्यांचं कार्य अद्भभूत; 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी' पाहिल्यावर मनाला शांती मिळते : अमित शहा
अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
| Updated on: Feb 08, 2022 | 8:04 PM
Share

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी (Statue of Equality) अर्थात जगग्दुरू रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याचं लोकार्पण 5 फेब्रुवारी रोजी करण्यात आलं. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यावेळी शाह यांनी आदि शंकराचार्य एवढंच श्री रामानुजाचार्याचं (Shri Ramanujacharya) कार्य अभ्दभूत असल्याचं म्हणाले. ‘संतांचा स्वभाव असतो सुक्ष्म लोकांचं गुणगाण गाऊन मोठं करणं. मी आज चेतना आणि उत्साह घेऊन पुढे जाणार आहे. ज्यांच्यात संवेदना असते धर्म आणि समाजासाठी काही करायची तळमळ असते, इच्छा असते अशा लोकांना काम करण्याची चेतना आणि उत्साह जीयरास्वामी देत आहेत. तुम्ही रामानुजाचार्यांच्या स्मारकातून हीच प्रेरणा मिळेल’, असंही शाह यावेळी म्हणाले.

‘रामाणय महाभारतापासून ते आजपर्यंत सनातन धर्मात चढउतार आले. पण तरीही सनातन धर्म टिकून राहिला. जेव्हाही सनातन धर्मावर संकट आलं तेव्हा त्याची ज्योत पुन्हा प्रज्वलित झाली. शंकराचार्यानंतर रामानुजाचार्यांनी मोठं काम केलं. आदी शंकराचार्याने सर्व मतमतांतरे एकत्र करून देशाला एकत्र केलं. सर्व मते एका छत्रछायेखाली आणले. रामनाजुचार्यांनी जीवन कवनाने सर्व देशाला सनातन धर्माशी जोडण्याचं काम केलं. कुरिवाज, कुप्रथा त्यांनी आपल्या कर्माने बदलल्या’, अशा शब्दात शाह यांनी श्री रामानुजाचार्य यांच्या कार्याचं कौतुक केलं.

‘रामानुजाचार्यांनी संपूर्ण देशाला समतेचा संदेश दिला हा संदेश युगानुयुगे राहील’

शाह पुढे म्हणाले की, ‘कोणत्याही संप्रदायाचा अनुयायी असेल तर त्याला इथे येण्याची प्रेरणा मिळेल. रामानुजाचार्यांच्या जन्माच्या एक हजार वर्षानंतर एवढा मोठा सोहळा होत आहे. वेदांचे मूळ वाक्य बाहेर काढून त्यांनी अनेक परंपरा मोडीत काढून समाजासमोर मांडले. आज एक हजारवर्षानंतरही तोच संदेश मिळत आहे. मोदींच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं. मी हा पुतळा पाहिला. दुरून पाहिल्यानंतर ही प्रतिमा अद्भूत वाटते. चित्त शांत करते आणि आनंददायी वाटते. पण जवळ गेल्यावर हॉलमध्ये रामानुजाचार्यांचे संदेश सर्व भाषेत कोरले आहेत. ते वाचत वाचत पुढे जात असतानाच भव्य मूर्तीचं दर्शन होतं. रामानुजाचार्य यांनीच संपूर्ण देशाला समतेचा संदेश दिला हा संदेश युगानुयुगे राहील’.

‘Statue of Equality पाहिल्यावर आत्म्याला एक अद्भुत शांती आणि प्रसन्नता मिळते’

रामानुजाचार्य यांचे जीवन आणि त्यांचा संदेश, सर्व प्राणी समान आहेत, हे वेदांचे मूळ वाक्य त्यांनी काळाच्या गर्तेतून बाहेर काढले आणि ते समाजामध्ये ठेवले, आपल्या कृतीने कुणासाठीही कटू न बोलता अनेक परंपरा मोडीत काढल्या. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीची प्रतिमेचं नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दंडी स्वामी यांच्या करकमलांद्वारे उद्घाटन झालं. मी आताच तिथे जाऊन आलो. ही प्रतिमा पाहिल्यावर आत्म्याला एक अद्भुत शांती आणि प्रसन्नता मिळते. देशातील सर्व मतांच्या सांप्रदायाचे आचार्य येथे उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांना इथे पाहून मला विश्वास वाटतो की आपली यात्रा कधीही थांबणार नाही. एकवेळ पुन्हा एकदा दिग्विजयी होऊत संपूर्ण जगाला ज्ञानचा प्रचार आणि प्रसार करेल, असा विश्वासही शाह यांनी यावेळी व्यक्त केला.

इतर बातम्या :

दलित, वंचित, शोषित, गरिबांसाठी काय केलं? समानतेचा संदेश देणाऱ्या मूर्तीचं अनावरण करताना मोदींचं उत्तर

रामानुजाचार्य यांच्याबद्दल बोलताना मोदींकडून बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख! यामागचा नेमका संदर्भ काय?

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.