VIDEO : अॅडवेंचर स्पोर्टसदरम्यान विद्यार्थिनी दुसऱ्या मजल्यावरुन पडली

छत्तीसगड येथील एका शाळेत अॅडवेंचर स्पोर्ट्स दरम्यान 11 वर्षीय विद्यार्थिनी दुसऱ्या मजल्यावरुन पडून गंभीर जखमी (student injured during adventure sports)   झाली.

VIDEO : अॅडवेंचर स्पोर्टसदरम्यान विद्यार्थिनी दुसऱ्या मजल्यावरुन पडली

रायपूर : छत्तीसगड येथील एका शाळेत अॅडवेंचर स्पोर्ट्स दरम्यान 11 वर्षीय विद्यार्थिनी दुसऱ्या मजल्यावरुन पडून गंभीर जखमी (student injured during adventure sports)   झाली. या विद्यार्थिनीला सध्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना रायपूर येथील रेडिअंट शाळेत घडली. या प्रकरणात अॅडवेंचरचे आयोजक आणि शाळेच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्तिषा, असं जखमी (student injured during adventure sports) मुलीचे नाव आहे.

रेडिअंट शाळेत अॅडवेंचर स्पोर्टसचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात शाळेतील अनेक मुलांनी सहभाग घेतला होता. यावेळी कार्तिषानेही या स्पोर्टसमध्ये सहभाग घेतला होता. 11 वर्षीय कार्तिषा 25 फूट उंचीवरील शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरुन दोरीने खाली उतरत असताना अचाकन पडली. विद्यार्थिनी पडल्याचा व्हडीओ सध्या समोर आला असून सर्वत्र तो व्हायरल झाला आहे.

रेडिअंट शाळेत 1800 मुलं शिकतात. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांकडून एक-एक हजार रुपये फी घेण्यात आली होती. फी घेऊन नाईट कॅम्पचे आयोजन केले होते. यामध्ये 400 विद्यार्थ्यांचा समावेश होता. येथे टेंट करुन मुलांची राहण्याची व्यवस्थाही केली होती.

यावेळी सर्व मुले काल (12 नोव्हेंबर) योगासह इतर अॅक्टिव्हीटी करु लागले. यामध्ये काही अॅडव्हेंचर स्पोर्ट्सही होते. ज्यामध्ये मुलांना दुसऱ्या मजल्यावरुन दोरीच्या सहाय्याने खाली उतरायचे होते. पण शाळेत या खेळाच्या पार्श्वभूमीवर काही सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नव्हती.

दम्यान, कार्तिषाला गंभीर दुखापात झाली असून तिच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणात पोलिसांनी आयोजक आणि शाळेच्या संचालकांवर गुन्हा दाखल केला. तसेच या घटनेची अधिक चौकशी पोलीस करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *