AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार एकवटणार, उद्यापासून दिल्लीत ‘सुशासन महोत्सव’; असा असेल कार्यक्रम

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेच्यावतीने उद्यापासून दिल्लीत दोन दिवस सुशासन महोत्सव पार पडणार आहे. 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम होत आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला भाजपचे काही मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या यावेळी मुलाखती होणार आहेत.

मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार एकवटणार, उद्यापासून दिल्लीत 'सुशासन महोत्सव'; असा असेल कार्यक्रम
Sushasan MahotsavImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 08, 2024 | 2:04 PM
Share

नवी दिल्ली | 8 फेब्रुवारी 2024 : दिल्लीत उद्यापासून दोन दिवस म्हणजे 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी ‘सुशासन महोत्सव‘ पार पडणार आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्यावतीने या सुशासन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा या सुशासन महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या सुशासन महोत्सवात भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री सामील होणार आहेत. तसेच केंद्रीय मंत्री मसुख मंडाविया आणि जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हाही उपस्थित राहणार आहेत.

दिल्लीतील जनपथ रोडवरील आंबेडकर इंटर नॅशनल सेंटरमध्ये सुशान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपशासित राज्यातील इतर मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. तसेच केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदारही या कार्यक्रमात येणार आहेत. शासन साक्षरतेबाबत खोलवर माहिती मिळावी या उद्देशाने सुशासन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे.

पहिला दिवस…

उद्या 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता सुशासन महोत्सवाला सुरुवात होणार आहे. दुपारी 4 ते 4.30 वाजेपर्यंत महोत्सवातील स्टॉल्सचं उद्घाटन होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि पुनावाला फिनकॉर्पचे एमडी अभय भुतडा यांच्या हस्ते होणार आहे.

त्यानंतर दुपारी 4.30 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मुख्य उद्घाटन सोहळा रंगणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, भाजपचे राष्ट्रीय संघटक आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे विश्वस्त व्ही. सतिश आणि पुनावाला फिनकॉर्पचे एमडी अभय भुतडा यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडणार आहे.

संध्याकाळी 5.30 ते 6.15 वा- आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सरमा यांची मुलाखत होणार आहे.

संध्याकाळी 6.15 ते 6.45 वा.- खासदार आणि भाजयूमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांची मुलाखत होईल.

संध्याकाळी 6.45 ते 7.30 वा.- केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची मुलाखत पार पडणार आहे.

संध्याकाळी 7.30 ते रात्री 8.15 वा. – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत होणार आहे.

दुसरा दिवस…

सकाळी 10.30 ते 11.15 वा. – निती आयोगाचे सीईओ बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांची प्रकट मुलाखत होईल.

सकाळी 11.15 ते दुपारी 12.15 वा.- जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची मुलाखत घेतली जाणार आहे.

दुपारी 12.15 ते 1 वा. सर्व राज्यातील स्टॉल्सचे प्रतिनिधी येऊन एकत्र चर्चा करणार आहेत. त्यानंतर लंच ब्रेक होणार आहे.

दुपारी 2 ते 3 वा- नागालँडचे पर्यटन आणि उच्च शिक्षण मंत्री तेमजेन इमना अलांग यांची मुलाखत होणार आहे.

दुपारी 3 ते 4 वा. – रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांची मुलाखत होईल.

दुपारी 4 ते संध्याकाळी 5 वा.- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मुलाखत होणार आहे.

संध्याकाळी 5 ते 6 वा. – नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची मुलाखत होणार असून त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.