दिल्ली एअरपोर्टवर बेवारस बॅग, RDX सारख्या भीषण स्फोटकांची शक्यता

राजधानी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर एक संशयीत बॅग (suspected bag was found on delhi airport) सापडली आहे.

दिल्ली एअरपोर्टवर बेवारस बॅग, RDX सारख्या भीषण स्फोटकांची शक्यता

दिल्ली : राजधानी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर एक संशयीत बॅग (suspected bag was found on delhi airport) सापडली आहे. या बॅगेत RDX सारखे भीषण स्फोटक (suspected bag was found on delhi airport) असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शुक्रवारी (1 नोव्हेंबर) पहाटे 3 वाजता ही बॅग सापडली. त्यामुळे एअरपोर्टवर काही वेळ एकच खळबळ उडाली होती.

दिल्ली एअरपोर्टवर बॅग सापडल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. तसेच सर्व प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होते. ही बॅग बेवारस असून कुणाची आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

“सध्या बॅग उघडली नाही. बॅग कुलिंगकिटमध्ये ठेवली आहे. काही तासानंतर बॅगची तपासणी केली जाईल. तपासणी दरम्यान बॅगेत RDX असावे, अशी शक्यता आहे”, असं सीआयएसएफ म्हणाले.

एअरपोर्ट पोलिसांना शुक्रवारी (1 नोव्हेंबर) पहाटे 3 वाजता एक संशयीत बॅग सापडल्याची माहिती मिळाली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ती बॅग ताब्यात घेतली. त्यानंतर या बॅगेत काय आहे, बॅग कुणाची याचा शोध घेत आहेत. त्यासोबत विमानतळ परिसरातीच सर्व सीसीटीव्ही तपासले जात आहेत.

प्रवाशांचा गोंधळ उडाला

एअरपोर्टवर संशयीत बॅग सापडल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला. त्यावेळी प्रवाशांना शांत करण्यासाठी थोडा वेळ लागला. एअरपोर्टवर आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

संशयीत बॅग जप्त केल्यानंतर टर्मिनल 3 समोरील रोड बंद केला आहे. त्यासोबत टर्मिनल 3 वरुन बाहेर येणारा रोडही बंद केला आहे. बॅगमध्ये काय वस्तू आहेत, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पण काही वृत्तांनुसार यामध्ये इलक्ट्रॉनिक सामान असल्याचे म्हटलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *