AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! देशाचा शत्रू अखेर ताब्यात, 26/11 चा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणलं

मोठी बातमी समोर येत आहे, तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आलं आहे, तहव्वूर राणा हा 26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. राणाला स्पेशल विमानानं दिल्लीमध्ये आणण्यात आलं आहे.

मोठी बातमी! देशाचा शत्रू अखेर ताब्यात, 26/11 चा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणलं
Tahawwur Rana Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 10, 2025 | 3:09 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, 26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आलं आहे, राणाला स्पेशल विमानानं दिल्लीमध्ये आणण्यात आलं आहे.  26/11च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणा याला आणणारं स्पेशल विमान इंडियन एअरस्पेसमध्ये दाखल झालं आहे. दिल्लीत हे विमान लँड झालं आहे. पालम विमानतळावरून त्याला एनआयएच्या हेडक्वॉर्टरला नेलं जाणार आहे. पालम विमानतळावर सुरक्षा यंत्रणांचा अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चार इनोव्हा, दोन सफारी, जॅमर, बॉम्ब विरोधी पथक या विमानतळावर दाखल आहे.

एनआयए मुख्यालयातील इन्व्हेस्टिगेशन सेलमध्ये केवळ 12 जणांना प्रवेश दिला जाणार आहे. हा सेल तिसऱ्या मजल्यावर तयार करण्यात आला आहे. ज्यांना प्रवेश दिला जाणार आहे, त्यामध्ये एनआयएचे डीजी सदानंद दाते, आयजी आशीष बत्रा आणि डीआयजी जया रॉय यांचा समावेश आहे.

तहव्वुर हुसैन राणा याची एनआयए कोर्टात हजेरी होण्यापूर्वी पटियाला हाऊस कोर्टच्या गेटबाहेर कव्हरेज करत असलेल्या पत्रकारांचे आयडी कार्ड तपासले जात आहेत. दिल्ली पोलिसांनी मिळालेल्या इनपुटच्या आधारे सतर्कतेने काम सुरू केले आहे. मीडिया प्रतिनिधींना कोर्टमध्ये प्रवेश दिला जाणार नाहीये. एनआयए मुख्यालयासमोर सामान्य नागरिकांची वर्दळ थांबवण्यात आलेली आहे. एनआयएच्या समोर असलेले जवाहरलाल नेहरू मेट्रो स्थानकाचे गेट क्रमांक -2 देखील सुरक्षाच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहे. दक्षिण विभागाचे डीसीपी एनआयए कार्यालयात पोहोचले आहेत आणि कार्यालयाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तहव्वुर हुसैन राणा सकाळी 9 ते 10 या वेळेत पोहोचण्याची शक्यता होती, मात्र इंधन भरण्यासाठी मध्ये एक थांबा घेण्यात आला. त्याला कुठून एनआयए मुख्यालयात आणायचे, याचा निर्णय शेवटच्या क्षणी घेतला जाईल. स्वॅट कमांडोंना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. तहव्वुर हुसैन राणा याच्या एनआयए कोर्टातील हजेरीपूर्वी पटियाला हाऊस कोर्टाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

एनआयए सर्वात आधी तहव्वुर राणाला 26/11च्या हल्ल्याप्रकरणी अटक करेल. त्याला एनआयएच्या हेडक्वॉर्टरला आणलं जाईल. तिथे त्याची मेडिकल टेस्ट होईल. त्यानंतर त्याला कोर्टात हजर करून त्याची रिमांड मागितली जाईल.

तहव्वुर राणाला मोठ्या सुरक्षेतच एनआयएच्या हेडक्वॉर्टरला नेलं जात आहे. या ठिकाणी अनेक लेअरची सेक्युरिटी तैनात करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे SWAT कमांडोच्या सुरक्षेतच त्याला नेण्यात येणार आहे. दिल्ली पोलिसांची अनेक वाहने राणाच्या ताफ्याला एस्कॉर्ट करतील. त्याला बुलेटप्रुफ गाडीतून नेलं जात आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.