मोठी अपडेट! निमिषा प्रियाला आता ग्रँड मुफ्ती अबूबकरही वाचवू शकणार नाहीत, समोर आलं नवं पत्र
निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा लवकरच अंमलात येऊ शकते. तलाल अब्दो महदीच्या भावाने येमेनच्या अॅटर्नी जनरलना पत्र लिहून ब्लडमनीच्या बदल्यात पैसे स्वीकारण्यास नकार दिला आहे आणि त्वरित फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. कुटुंबाचे म्हणणे आहे की निमिषाने गुन्ह्याच्या मर्यादा ओलांडल्या होत्या आणि तिला माफ केले जाऊ नये.

निमिषा प्रियाच्या मृत्यूदंडाची शिक्षा लवकरच लागू होऊ शकते. तलाल अब्दो महदी याच्या भावाने येमेनच्या अटर्नी जनरलला अधिकृत पत्र लिहिलं आहे. तलालच्या भावाच्या म्हणण्यानुसार, आमचं कुटुंब दियाह (ब्लड मनी) स्वीकारण्यास तयार नाही, त्यामुळे लवकरात लवकर मृत्यूदंडाची अंमलबजावणी करावी. निमिषाला वाचवण्यासाठी ग्रँड मुफ्ती अबूबकर खूप सक्रिय होते. मुफ्तींनीच फाशीची शिक्षा तात्पुरती रद्द करवली होती, पण आता तलालचं कुटुंब ज्या पद्धतीने ठाम आहे, त्यामुळे अबूबकरही निमिषाला माफी मिळवून देऊ शकणार नाहीत, असं बोललं जात आहे.
तलालचा भाऊ अब्दुल फतह महदी याने अटर्नी जनरलला विनंती केली आहे की, या निर्णयात मुद्दाम विलंब केला जात आहे, जो न्यायाच्या विरोधात आहे. आम्ही मागणी करतो की, याची तातडीने अंमलबजावणी करावी.
पत्रात काय काय सांगितलं आहे?
अब्दुलने येमेनच्या अटर्नी जनरलला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, 2020 मध्येच निमिषा प्रियाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2023 मध्ये 177 क्रमांकाच्या पत्राद्वारे राजकीय परिषदेने याला मान्यताही दिली होती. 2025 मध्ये यासाठी तारीखही निश्चित झाली होती. त्यामुळे आता याला आणखी विलंब करणं योग्य नाही. अब्दुल फतह महदी याचं म्हणणं आहे की, निमिषा प्रकरणात अंतिम आणि बंधनकारक निर्णय झाला आहे. तरीही ब्लड मनीच्या नावाखाली याला रोखलं जात आहे, हे चुकीचं आहे. आम्ही किसास अंतर्गत न्याय मागतो. निसर्गात प्रत्येकाला न्यायाचा अधिकार आहे.
ब्लड मनीवर कुटुंब तयार नाही
अब्दुल फतह याच्या मते, त्याचं कुटुंब ब्लड मनी स्वीकारण्यास तयार नाही. याबाबत जे कोणी प्रयत्न करत आहेत, ते आपली ऊर्जा वाया घालवत आहेत. फतह म्हणतो की, लोक निमिषाच्या कुटुंबाला आणि समर्थकांना भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत. अब्दुलच्या मते, निमिषाला माफी मिळू शकत नाही, कारण तिने सर्व गुन्ह्याच्या मर्यादा ओलांडल्या होत्या. हत्येनंतर तिने जे केलं, त्याचा विचार केला तरी लोक दु:खी होतील. त्यांनी पुढे सांगितलं की, माझ्या भावाचं (तलालचं) रक्त हे बाजारातली कोणतीही वस्तू नाही, जी लोक विकत घेऊ शकतील. ते कधीही विकलं जाणार नाही.
काय आहे शेवटचा पर्याय
तलालच्या कुटुंबाने अटर्नी जनरलला ज्या पद्धतीने पत्र लिहिलं आहे, त्यामुळे हे स्पष्ट झालं आहे की, निमिषाकडे आता जास्त पर्याय उरलेले नाहीत. येमेनच्या कायद्यानुसार फक्त ब्लड मनीच्या माध्यमातूनच निमिषाची सुटका होऊ शकते. ब्लड मनी ही कोणत्याही दबावाशिवाय स्वीकारली गेल्यासच माफी मिळते. ब्लड मनीचा मार्ग बंद झाल्यास येमेन सरकार मृत्यूदंडाची अंमलबजावणी करण्याबाबत अंतिम निर्णय घेईल. यापूर्वी 16 जुलै ही तारीख निश्चित होती, पण आता याबाबत स्पष्टता नाही.
