AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत बायोटेककडून नेझल व्हॅक्सिनची ट्रायल सुरु, यशस्वी ठरल्यास लसीकरण अधिक स्वस्त होणार

कोरोना व्हॅक्सिन निर्माती स्वदेशी कंपनी भारत बायोटेकने कोरोनाच्या नेझल अर्थात नाकातून घेतल्या जाणाऱ्या लसीची चाचणी सुरु केली आहे. या प्रॉडक्टचं नाव BBV154 असं आहे. हे एक इंटरनेझल व्हॅक्सिन आहे.

भारत बायोटेककडून नेझल व्हॅक्सिनची ट्रायल सुरु, यशस्वी ठरल्यास लसीकरण अधिक स्वस्त होणार
Bharat Biotech covaxin
| Updated on: Mar 05, 2021 | 4:55 PM
Share

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असतानाता आता एक चांगली बातमी समोर येत आहे. कोरोना व्हॅक्सिन निर्माती स्वदेशी कंपनी भारत बायोटेकने कोरोनाच्या नेझल अर्थात नाकातून घेतल्या जाणाऱ्या लसीची चाचणी सुरु केली आहे. या प्रॉडक्टचं नाव BBV154 असं आहे. हे एक इंटरनेझल व्हॅक्सिन आहे. फेब्रुवारीमध्ये सेंट्रल ड्रग्ज स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (SDSCO) ने भारत बायोटेकला व्हॅक्सिनच्या पहिल्या टप्प्यातील चाचणी करण्याची परवानगी दिली होती.(Testing of Bharat Biotech’s nasal corona vaccine begins)

लसीकरण मोहीम सोपी आणि वेगवान होणार

मिळालेल्या माहितीनुसार या व्हॅक्सिनची चाचणी सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी 10 लोकांना निवडण्यात आलं आहे. आतापर्यंत 2 लोकांना ही लस देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्या दोघांचीही प्रकृती चांगली आहे. भारत बायोटेकडूनच ही माहिती देण्यात आली आहे. महत्वाची बाब ही की, भारत बायोटेकची नाकावाटे घेतल्या जाणाऱ्या लसीची चाचणी यशस्वी ठरल्यास देशातील लसीकरण मोहीम अजून सोपी आणि वेगवान होईल.

भारत बायोटेकने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये वॉशिंग्टन विद्यापीठाशी करार केला आहे. या नव्या नेझल व्हॅक्सिनचा केवळ एकच डोस घ्यावा लागणार आहे. संशोधनानुसार हा सर्वात चांगला पर्याय आहे, असं भारत बायोटेकचे डॉ. कृष्णा इल्ला यांनी त्यावेळी सांगितलं होतं.

‘कोव्हॅक्सिन’ ठरतेय अधिक प्रभावी

गेल्या काही दिवसांपासून शंका-कुशंकांच्या वादळात सापडलेली कोव्हॅक्सिन (covaxin) ही लस आता प्रभावी ठरत असल्याची माहिती समोर आली आहे. हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीकडून बुधवारी तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यात कोव्हॅक्सिन लस 81 टक्के परिणामकारक ठरत असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती भारत बायोटेकने दिली. त्यामुळे आता परिणामकारकतेच्या बाबतीत कोव्हॅक्सिन लसीने सीरमच्या कोव्हिशिल्ड लशीलाही मागे टाकल्याची चर्चा आहे.

कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत 25800 स्वयंसेवक सहभागी झाले होते. भारतीय वैद्यकीय संशोधन समितीच्या (ICMR) भागीदारीत या चाचण्या पार पडल्या होत्या. सुरुवातीच्या काळात भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लस 60 टक्के प्रभावी ठरेल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, आता ही लस अपेक्षेपेक्षा अधिक प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे. तसेच ही लस ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही अधिक परिणामकारक ठरल्याचे सांगितले जात आहे.

24 तासात कधीही, तुमच्या सोयीनुसार कोरोना लस घ्या!

1 मार्चपासून देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु करण्यात आला आहे. या टप्प्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह वयानं ज्येष्ठ असलेल्या अनेक नेतेमंडळींनीही कोरोनाची लस टोचून घेतली आहे. मात्र, दुसऱ्या टप्प्यात सकाळी 9 पासून ते संध्याकाळी 5 पर्यंतच कोरोना लसीकरण केंद्रांवर लस दिली जात होती. पण आता रुग्णालये आपल्या सुविधेनुसार रुग्णांचा 24 तासांत कधीही कोरोनाची लस देऊ शकणार आहे. तशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

मोठी बातमी! SBI, Infosys सह ‘या’ कंपन्या कर्मचार्‍यांच्या कोविड लसीकरणाचा खर्च उचलणार

आता 24 तासात कधीही, तुमच्या सोयीनुसार कोरोना लस घ्या! केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा

चिंता मिटली; भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ ठरतेय अधिक प्रभावी; ‘सीरम’च्या लशीलाही टाकले मागे?

Testing of Bharat Biotech’s nasal corona vaccine begins

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.