मोफत कोरोना लशीचे आश्वासन म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन नाही, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

निवडणुकीदरम्यान नागरिकांना मोफत कोरोना लशीचे आश्वासन देणे म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन नाही, असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलं आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने बिहारच्या नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन आपल्या जाहिरनाम्यात दिले होते.

मोफत कोरोना लशीचे आश्वासन म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन नाही, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
Follow us
| Updated on: Oct 31, 2020 | 7:57 PM

दिल्ली : निवडणुकीदरम्यान नागरिकांना मोफत कोरोना लशीचे आश्वासन देणे म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन नाही, असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलं आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने बिहारच्या नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन आपल्या जाहिरनाम्यात दिले आहे. त्यानंतर या आश्वानामुळे भाजपवर देशभरातून टीका होत आहे. (The promise of free corona vaccine is not a violation of the code of conduct explained Election Commission)

आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी निवडणूक आयोगाकडे एक तक्रार दाखल केली. या तक्रारीत भाजपच्या आश्वासनावर गोखले यांनी आक्षेप घेतला होता. निवडणुकीच्या काळात मोफत लशीचे आश्वासन देणे हे भेदभावजनक आहे. तसेच, केंद्र सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग केला जातोय, असा आरोप गोखले यांनी आपल्या तक्रारीत केला होता. या तक्रारीच्या उत्तरादाखल निवडणूक आयोगाने मोफत लशीची घोषणा करण्यात काही गैर नसल्याचं सांगितलं आहे.

पक्षाला कल्याणकारी घोषणा करण्याचा अधिकार 

निवडणूक आयोगाने हा निर्णय देताना आचारसंहितेचे नियम तसेच संविधानातील तरतुदींचा आधार घेतला आहे. आचारसंहितेच्या भाग आठ नुसार मोफत लशीची घोषणा केल्याने आचारसंहितेचे उल्लंघन होत नाही; तसेच भारतीय संविधानानुसार कुठल्याही राज्याला वेगवेगळ्या कल्याणासाठी योजना बनवण्याचा अधिकार आहे. या अधिकारानुसार आपल्या जाहीरनाम्यात अशा प्रकारच्या घोषणा करणे म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन होत नाही असे, निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

भाजपने बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिहारच्या जनतेला मोफत कोरोना लशीचे आश्वासन दिले आहे. यानंतर भजपसोबतच एनडीए पक्षातील इतर घटक पक्षांवर विरोधकांकडून सडकून टीका करण्यात येत होती. भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग केला जातोय असा आरोपदेखील करण्यात येत होता. आरटीआय कार्यकर्ते गोखले यांनी केलेल्या तक्रारीनंतर आता निवडणूक आयोगाने मोफत लशीच्या निर्णयांने आचासंहितेचा भंग होत नाही असं सांगितलं आहे.

संबंधित बातम्या :

बिहारचे मुख्यमंत्री तेजस्वी यादव झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही, शेवटी जनभावना महत्त्वाची : संजय राऊत

Bihar Election 2020: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 53.54 टक्के मतदान

‘बिहारमध्ये माझा बलात्कार आणि हत्या झाली असती’, अभिनेत्री अमिषा पटेलचा बिहारच्या बड्या नेत्यावर गंभीर आरोप

(The promise of free corona vaccine is not a violation of the code of conduct explained Election Commission)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.