AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत तर वेदात अगोदरच, न्यूटन तर फार नंतर आला, हरिभाऊ बागडेंनी अजून काय काय केला दावा

Theory of Gravity : सफरचंद डोक्यावर पडलं नी गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला, असा सिद्धांत तुम्ही आम्ही विज्ञानाच्या पुस्तकात वाचला आहे. पण न्यूटनच्या हजारो वर्षाअगोदर गुरुत्वाकर्षणाचा नियम वेदांमध्ये नमूद होता, असे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले.

गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत तर वेदात अगोदरच, न्यूटन तर फार नंतर आला, हरिभाऊ बागडेंनी अजून काय काय केला दावा
हरिभाऊ बागडे Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 06, 2025 | 3:49 PM
Share

न्यूटन हा शास्त्रज्ञ सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता. त्याच्या डोक्यावर फळ पडलं आणि त्याने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत शोधला, अशी मांडणी गेल्या शे-सव्वाशे वर्षात जगाला माहिती आहे. विज्ञानाच्या पुस्तकात हा सिद्धांत आपण शिकलोय. पण न्यूटनच्या हजारो वर्षाअगोदर गुरुत्वाकर्षणाचा नियम वेदांमध्ये नमूद होता, असे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या जयपूर येथील विभागीय दीक्षांत कार्यक्रमात ते बोलत होते.

भारताला समृद्ध वारसा

“भारत हा पूर्वीपासून ज्ञान आणि विज्ञानमध्ये समृद्ध आहे. भारताने पूर्ण जगाला दशांश प्रणाली दिली. भारद्वाज ऋषींनी विमान तयार करण्यावर ग्रंथरचना केली. न्यूटनने जगाला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत तर खूप उशीरा सांगितला. गुरूत्वाकर्षाचा नियमाचा उल्लेख तर फार पूर्वीपासून वैदिक ग्रंथात आढळतो.” असे बागडे नाना म्हणाले.

राज्यपाल बागडे काय म्हणाले?

“अनेक शोधाची जननी भारत आहे. वीज असो वा विमान, याचा उल्लेख ऋग्वेदासहीत इतर अनेक ऐतिहासिक ग्रंथात मिळतो. भारद्वाज ऋषी यांनी विमान तयार करण्याविषयी एक पुस्तक सुद्धा लिहिली आहे. तर 50 वर्षांपूर्वी नासाने पत्र लिहून या पुस्तकाची भारताकडे मागणी केली होती.” असे बागडे म्हणाले.

इंग्रजांनी भारतीय ज्ञान दाबण्याचा प्रयत्न केल्याचे राज्यपाल म्हणाले. त्यामुळे आता भारतीय विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता वाढवणे आणि त्याला भारतीय ज्ञान आणि विज्ञानसोबत जोडणे महत्त्वपूर्ण आहे, असे बागडे म्हणाले.

जगभरातील विद्यार्थी नालंदा, तक्षशिला

नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठात जगभरातील विद्यार्थी शिकायला येत होते, असे बागडे नाना म्हणाले. तेव्हा संस्कृत ही भाषा होती. त्यावेळी इतर भाषा अध्ययनासाठी, अभ्यासासाठी नव्हत्या असे ते म्हणाले. नालंदा विद्यापीठ बख्तियार खिलजी याने जाळले होते. आता नालंदा विद्यापीठ नव्याने स्थापन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

हरिभाऊ बागडे यांच्या विधानापूर्वी सुद्धा अनेक नेत्यांनी आणि आध्यात्मिक क्षेत्रातील धुरंधरांनी, बाबांनी असाच दावा केलेला आहे.  राईट्स बंधुंनी विमान उडवण्यापूर्वी भारद्वाज ऋषी यांच्या विमान तयार करण्याच्या ग्रंथा आधारे शिवकर बापूजी तळपदे यांनी विमान तयार करून उडवल्याचा दावा करण्यात येतो.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.