AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 एप्रिल पासून बदलताय हे नियम, ज्याचा थेट तुमच्यावर होणार परिणाम

एक एप्रिलपासून नवीन नियम लागू होणार आहेत. ज्याचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. पण यासोबतच काही नवीन नियम लागू होणार आहे.

1 एप्रिल पासून बदलताय हे नियम, ज्याचा थेट तुमच्यावर होणार परिणाम
| Updated on: Mar 23, 2024 | 4:10 PM
Share

मार्च महिना संपत आला आहे. मार्च महिना संपताच २०२३-२४ हे आर्थिक वर्ष देखील संपणार आहे. या आर्थिक वर्षात तुम्ही अनेक व्यवहार केले असतील. पण आता हे आर्थिक वर्ष संपताच 1 एप्रिलपासून पैशांशी संबंधित 6 नियम बदलणार आहेत. यामध्ये क्रेडिट कार्डच्या नियमांपासून ते NPS नियमांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. पुढील महिन्यापासून कोणते नियम बदलणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्यावर होईल जाणून घ्या.

NPS साठी नवीन नियम

पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) NPS गुंतवणूकदारांना सायबर फसवणुकीपासून वाचवण्यासाठी द्विस्तरीय सुरक्षा प्रणाली लागू करणार आहे. या अंतर्गत, दोन घटक आधार-आधारित प्रमाणीकरण सुरू केले जाईल. हे सर्व युजर्ससाठी अनिवार्य असेल. नवीन नियम 1 एप्रिल 2024 पासून लागू होणार आहे.

SBI क्रेडिट कार्डमध्ये बदल

SBI कार्डने जाहीर केले आहे की, काही विशिष्ट क्रेडिट कार्डांद्वारे भाडे देयांवर रिवॉर्ड पॉइंट्स 1 एप्रिल 2024 पासून थांबवले जाणार आहे. यामध्ये AURUM, SBI Card Elite, SBI Card Elite Advantage, SBI कार्ड पल्स यांचा समावेश आहे. काही क्रेडिट कार्डावर भाड्याच्या देयकांवर रिवॉर्ड पॉइंट मिळतात.

ola मनी वॉलेट

OLA Money ने जाहीर केले की ते 1 एप्रिल 2024 पासून प्रति महिना 10,000 रुपयांच्या कमाल वॉलेट लोड मर्यादेसह लहान PPI (प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट) वॉलेट सेवांवर पूर्णपणे स्विच करत आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांना एसएमएस पाठवून याची माहिती दिली आहे.

ICICI बँक लाउंज प्रवेश

ICICI बँकेने विमानतळ लाउंज प्रवेशाच्या अटींमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या तिमाहीत ग्राहकांना किमान 35,000 रुपये खर्च करावे लागतील. यानंतरच पुढील तिमाहीसाठी विमानतळावरील लाउंजचा मोफत प्रवेश अनलॉक केला जाईल.

येस बँक लाउंज प्रवेश लाभ

येस बँकेने नवीन आर्थिक वर्षापासून आपल्या देशांतर्गत लाउंज प्रवेश लाभांच्या धोरणांमध्ये बदल केले आहेत. बँकेच्या म्हणण्यानुसार, पुढील तिमाहीत सर्व ग्राहकांना लाउंजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी चालू तिमाहीत किमान 10,000 रुपये खर्च करावे लागतील.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.