AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jammu Kashmir | अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला, 3 जवान जखमी

जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथील दहशतवादी हल्ल्यात 3 जवान जखमी झाले आहेत. (terrorist attack soldier injured Jammu Kashmir)

Jammu Kashmir | अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला, 3 जवान जखमी
दहशतवादी हल्ल्यात 3 जवान जखमी झाले आहेत.
| Updated on: Jan 27, 2021 | 1:19 PM
Share

जम्मू : जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथील दहशतवादी हल्ल्यात 3 जवान जखमी झाले आहेत. अनंतनगामधील बिजबेरा या भागात भारतीय सैन्याने गस्तीवर असताना हा हल्ला झाला. हल्ल्यात जखमी झालेल्या एका जवानाची प्रकृती गंभीर आहे. हा हल्ला झाल्यानंतर भारतीय सैन्याने या परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेणे सुरु केले आहे. (Three soldier were injured in a terrorist attack at Anantnag in Jammu and Kashmir)

मिळालेल्या माहितीनुसार अनंतनाग जिल्ह्यातील शम्शीपुराजवळील श्रीनगर-जम्मू हायवेवर जवान गस्तीवर होते. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. उत्तरादाखल भारतीय जवानांनीसुद्धा दहशतवाद्यांवर प्रतिहल्ला केला. मात्र, दहशतवादी या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झाले. हल्ल्यानंतर आता भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांना शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जखमी झालेल्या जवानांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमी झालेल्यांपैकी एका जवानाची प्रकृती गंभीर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या दहशतवाद्यांनी परिसरातील एका शाळेच्या छतावरुन जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये शाळेचेही बरेच नुकसान झाले आहे. दरम्यान हा हल्ला झाल्यानंतर जवानांकडून शोधमोहीम सुरु असून अद्याप दहशतवाद्यांना पकडण्यात यश आलेले नाही.

संबंधित बातम्या :

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, भाजपच्या 3 नेत्यांची गोळ्या झाडून हत्या

जम्मूमध्ये दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण, अवघ्या 20 व्या वर्षी गमावले प्राण

आजोबाच्या मृतदेहावर नातू, काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचं हृदय पिळवटून टाकणारं दृश्य

(Three soldier were injured in a terrorist attack at Anantnag in Jammu and Kashmir)

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.