तिरुपती : सर्वात श्रीमंत मंदिराचं 2 हजार 937 कोटींच्या बजेटला मंजुरी, व्याजातून 533 कोटींची कमाई!

तिरुपती : सर्वात श्रीमंत मंदिराचं 2 हजार 937 कोटींच्या बजेटला मंजुरी, व्याजातून 533 कोटींची कमाई!

तिरुपती देवस्थान या सर्वात श्रीमंत मंदिरानं आपलं बजेट सादर केलं आहे. 2021 - 2022 साठी मंदिर समितीनं 2 हजार 937 कोटींच्या बजेटला मंजुरी दिली आहे.

सागर जोशी

|

Feb 28, 2021 | 11:15 PM

नवी दिल्ली : तिरुमला तिरुपती देवस्थान या सर्वात श्रीमंत मंदिरानं आपलं बजेट सादर केलं आहे. 2021 – 2022 साठी मंदिर समितीनं 2 हजार 937 कोटींच्या बजेटला मंजुरी दिली आहे. शनिवारी रात्री उशिरा वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली TTD बोर्डाची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत बजेटला मंजुरी देण्यात आली आहे.(Tirupati temple approves budget of Rs 2,937 crore)

मंदिरात 2020 – 21 मध्ये दानपेटी आणि अन्य देणग्यांमधून 1 हजार 131 कोटी रुपयांचं दान मिळाल्याचा अंदाज आहे. कुटीर दान योजनेद्वारे गैर-लाभाची संपत्ती आणि रिकाम्या कॉटेजसाठी 100 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा अंदाज आहे. तर ठेवींवरील व्याजातून 533 कोटी रुपये व्याज मिळण्याचा अंदाज आहे. तर प्रदासातून मिळालेली रक्कम 375 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा अंदाज आहे. दर्शनातून 210 कोटी रुपये, कल्याणटक्कामधून 131 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा अंदाज आहे.

बोर्डाने हा निर्णय घेतला आहे की, जर अयोध्या राम मंदिर निर्माण ट्रस्ट TTDला जमीन अधिग्रहणासाठी पुढे आलं तर ते अयोध्येत श्रीवारी मंदिर किंवा भजन मंदिर वा सुविधा केंद्राचं निर्माण करु शकतं. त्याचबरोबर TTDने ही घोषणाही केली आहे की, मुंबई आणि जम्मू-काश्मीरमध्ये श्रीवारी मंदिरांच्या निर्माणासाठी लवकरच भूमिपूजन केलं जाईल. त्यांनी गायीला राष्ट्रीय पशू म्हणूनही घोषणा करण्याची परवानगी दिली आहे. त्याबाबत केंद्राकडेही शिफारस केली जाणार आहे.

तिरुपती मंदिराच्या बोर्डानं TTD कर्मचाऱ्यांच्या कोरोना लसीकरणाचाही निर्णय घेतला आहे. बोर्डाने 14 एप्रिलला तिरुमला मंदिरात अर्जिता सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. तसंच बोर्डाने TTD द्वारे संचलित सर्व सहा वेद पाठशाळांना ‘श्री व्यंकटेश्वरम वेद विज्ञान पीठम’च्या नावाने ओळखण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तसंच वर्तमानात सर्व शाळांना वैदिक शिक्षकांचा पगार 22 हजारावरुन 35 हजार 150 रुपयांपर्यंत वाढवला आहे.

इतर बातम्या :

महाराष्ट्रातील तरुण उद्योगपतीची तिरुपती बालाजी देवस्थानच्या विश्वस्तपदी नेमणूक

बालाजीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात सोलापूरच्या तिघा भक्तांचा मृत्यू

Tirupati temple approves budget of Rs 2,937 crore

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें