TV9 Festival of India: दांडिया, संगीत, पूजा पाठ अन् बरंच काही, TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या तिसऱ्या आवृत्तीत मिळणार खास अनुभव
हजारो भारतीयांची मने जिंकणाऱ्या आणि प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या 2 यशस्वी आवृत्त्यांनंतर 'TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया' आता पुन्हा एकदा परतला आहे. हा फेस्टिव्हल 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम येथे आयोजित केला जाणार आहे.

हजारो भारतीयांची मने जिंकणाऱ्या आणि प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या 2 यशस्वी आवृत्त्यांनंतर ‘TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ आता पुन्हा एकदा परतला आहे. यावेळी तो आणखी मोठा, भव्य आणि संस्मरणीय असणार आहे. TV9 नेटवर्कने TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया – द फ्रेंड्स अँड फॅमिली फेस्टची घोषणा केली आहे. हा फेस्टिव्हल 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम येथे आयोजित केला जाणार आहे.
TV9 नेटवर्कचे सीओओ के. विक्रम म्हणाले की, ‘मागील दोन आवृत्त्यांच्या प्रचंड यशानंतर, यावेळी आम्ही फेस्टिव्हलची पातळी आणखी वर नेत आहोत. लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट, सेलिब्रिटी डीजेसह दांडिया-गरबा नाईट्स आणि महादुर्गा पूजा हे कार्यक्रम हे मुख्य आकर्षण असणार आहेत. लाईफस्टाईल स्टॉल्समध्ये आंतरराष्ट्रीय ब्रँड देखील असणार आहेत. हा महोत्सव भारतीय संस्कृती, परंपरा आणि आधुनिकतेचे मिश्रण आहे आणि हाच टीव्ही 9 नेटवर्कचा आत्मा आहे.”
लाईव्ह म्युझिक परफॉर्मन्स
सचेत-परंपरा: सचेत-परंपरा ही जोडी रविवार, 28 सप्टेंबर, संध्याकाळी 7 वाजल्यापासून ‘अगर साथ मेरे तू है हमसफर’ (फिल्म सैय्यारा) पासून ‘मैया मैनु’, ‘बेखयाली’, ‘पल पल दिल के पास’, ‘मलंग सजना’, ‘हर हर महादेव’ आणि ‘चुरा लिया’ पर्यंतची गाणी रंगमंचावर सादर करणार आहेत.

शान – सुप्रसिद्ध गायक शान बुधवार, 1 ऑक्टोबर, संध्याकाळी 7 वाजल्यापासून ‘चांद सिफारीश’, ‘मुसू मुसू हसी’, ‘दिल ने तुमको’, ‘वो पेहली बार’ आणि ‘जब से तेरे नैना’ ही हिट गाणी सादर करणार आहे.
दांडिया डान्स नाईट्स
- 29 सप्टेंबर: डीजे साहिल गुलाटी
- 30 सप्टेंबर: डीजे डी’आर्क
- 2 ऑक्टोबर: एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय डीजेचा परफॉर्मन्स
दैनिक सांस्कृतिक परफॉर्मन्स
- बॉलीवूड चार्टबस्टरपासून ते लोकसंगीत, फ्यूजन, इंडी बीट्सचे लाइव्ह परफॉर्मन्स.
महा दुर्गा पूजा
दिल्लीतील सर्वात उंच आणि मोठ्या दुर्गा पूजा पंडालमध्ये भव्य सजावट करण्यात आली आहे. यावेळी पूजा पाठ, विधी करण्यात येणार आहे. यातून आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होणार आहे.

TV9 Festival of India
लाईफस्टाईल शॉपिंग एक्स्पो
28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात दररोज सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या काळात हस्तकला, फॅशन, सजावट, सौंदर्य उप्तादने, टेक उत्पादने, दागिने, फर्निचर यांची खरेदी करता येणार आहे.
फूड फेस्टिव्हल
काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतच्या सर्व प्रादेशिक पाककृतींचा आस्वाद या फेस्टिव्हलमध्ये घेता येणार आहे.
फॅमिली आणि मुलांच्या मनोरंजनासाठी खास सुविधा
फॅमिली आणि मुलांच्या मनोरंजनासाठी खास कार्यशाळा, खेळ, स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत.
महत्वाच्या तारखा
- लाईफस्टाईल शॉपिंग एक्स्पो आणि महा दुर्गा पूजा – 28 सप्टेंबर – 2 ऑक्टोबर 2025
- सचेत-परंपरा लाईव्ह कॉन्सर्ट – 28 सप्टेंबर, संध्याकाळी 7 वाजता
- शान लाईव्ह कॉन्सर्ट – 1 ऑक्टोबर, संध्याकाळी 7 वाजता

Shan
दांडिया नाईट्स
- 29 सप्टेंबर – डीजे साहिल गुलाटी
- 30 सप्टेंबर – डीजे डी’आर्क
- 2 ऑक्टोबर – आंतरराष्ट्रीय डीजे
महत्त्वाची माहिती
- ठिकाण: मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम, नवी दिल्ली
- वेळ: सकाळी 10 ते रात्री 10
- लाईफस्टाईल एक्स्पोमध्ये मोफत प्रवेश (सकाळी 10 ते संध्याकाळी 6)
- तिकिटे BookMyShow वर उपलब्ध
अधिक माहितीसाठी https://www.tv9festivalofindia.com/ या वेबसाईटला भेट द्या
