पाकिस्तानमधील दोन कोटी लोकांचं एकच उत्तर, पाक सरकारची झोप उडवणारी बातमी, मोठा हादरा बसणार?
भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे, या सर्व पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली असून, या बातमीमुळे सरकारची झोप उडाली आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे, सात मे रोजी भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले असून, 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. दरम्यान त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान युद्ध व्हावं की नको? यावर पाकिस्तानमधील जनतेचा कौल सांगणारा एक सर्व्हे समोर आला आहे. पाकिस्तान सरकारला हादरून सोडणारा असा हा सर्व्हे आहे, या सर्व्हेमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील तब्बल 2 कोटी लोकांनी जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं तर आम्ही पाकिस्तानला साथ देणार नसल्याचं म्हटलं आहे. हा सर्व्हे पाकव्याप्त काश्मीर आणि पंजाबमधील काही जिल्ह्यांमध्ये करण्यात आला होता.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले होते, भरतानं दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांवर हल्ला केला. यापुढे अशा प्रकारचं कोणतंही कृत्य खपून घेतलं जाणार नाही असा इशाराचं या हल्ल्यातून भारतानं पाकिस्तानला दिला होता. पाकिस्तानच्या सरकारकडून देखील भारतावर काही आरोप करण्यात आले होते. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढाला, या सर्व पार्श्वभूमीवर हा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेमध्ये धक्कादायक गोष्ट समोर आली ती म्हणजे पाकिस्तानमधील जनताच पाकिस्तानसोबत नाहीये. जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं तर आम्ही पाकिस्तानची साथ देणार नाही असं तब्बल दोन कोटी लोकांनी म्हटलं आहे.
या लोकांचं असं म्हणणं आहे की, भारतासारख्या देशासोबत युद्ध करणं म्हणजे स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. पाकिस्तान सध्या कोणत्या परिस्थितीमधून जात आहे, हे संपूर्ण जगाला माहिती आहे. जीडीपीपासून ते अर्थव्यवस्थेपर्यंत सगळे प्रश्नच प्रश्न आहे. मग अशा परिस्थितीमध्ये भारतासोबत युद्ध करण्यात अर्थच काय असा सवाल या लोकांनी केला आहे, तसेच पाकिस्तानी सेना प्रचंड अन्याय करत असल्याचा आरोपही यापैकी अनेक लोकांनी केला आहे.