नातं टिकवण्यात टॉपर अपयशी, IAS कपल टीना दाबी आणि अतहर खान यांचा घटस्फोटासाठी अर्ज

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) 2015 च्या परीक्षेत देशात टॉप येणाऱ्या IAS अधिकारी टीना दाबी आणि त्यांचे IAS पती अतहर खान नातं टिकवण्यात अपयशी ठरले आहेत.

नातं टिकवण्यात टॉपर अपयशी, IAS कपल टीना दाबी आणि अतहर खान यांचा घटस्फोटासाठी अर्ज
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 10:00 PM

जयपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) 2015 च्या परीक्षेत देशात टॉप येणाऱ्या IAS अधिकारी टीना दाबी आणि त्यांचे IAS पती अतहर खान नातं टिकवण्यात अपयशी ठरले आहेत. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात मोठे चढउतार सुरु असल्याचं समोर आलं आहे. दोघांनीही खासगी आयुष्यातील मतभेदांनंतर जयपूरच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. ते परस्पर संमतीने घटस्फोट घेणार आहेत. त्यांचं लग्न 2018 मध्ये झालं होतं. अतहर मुळचे काश्मीरचे आहेत (UPSC Topper IAS Tina Dabi and Athar Khan file for divorce).

टीना दाबी 2015 मध्ये UPSC च्या टॉपर राहिल्या आहेत. त्याच वर्षी अतहर खान दुसऱ्या क्रमांकावर होते. ते दोघे IAS च्या प्रशिक्षणाच्या काळातच एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघेही राजस्थान केडरचे अधिकारी आहेत. त्यांना जयपूरमध्येच पोस्टिंग मिळाली आहे.

टीनाने खान आडनाव हटवलं

टीनाने काही वेळेपूर्वीच आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंट्सच्या नावातून पतीचं आडनाव असलेलं खान नाव हटवलं आहे. यानंतर अतहर खान यांनी देखील टीनाला इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं होतं. यानंतर दोघांच्याही लग्नाबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. 2018 मध्ये दोघांनीही लग्न केलं तेव्हा तो चर्चेचा विषय ठरला होता. अनेक राजकीय नेत्यांनी या टॉपर IAS कपलला सुखी आयुष्याच्या सदिच्छा दिल्या होत्या. दुसरीकडे हिंदू महासभेने हा प्रकार लव जिहादचा असल्याचा आरोप करत लग्नाला विरोध केला होता.

दरम्यान, टीना दाबी मूळची जयपूरचीच आहे. असं असलं तरी त्यांचा जन्म भोपाळमध्ये झाला होता. कान्वेंट ऑफ जीसस अँड मेरी स्कूलमधून त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्या 7 वीच्या वर्गात असताना त्यांचं संपूर्ण कुटुंब दिल्लीत शिफ्ट झालं होतं. टीना दाबी यांचे वडील जसवंत दाबी आणि आई हिमानी दोघेही इंजिनीअर आहेत. दोघांनीही यूपीएससी आणि आयएस परीक्षा पास केलेली आहे. UPSC मध्ये निवड झाल्यानंतर टीना आणि अतहर मसूरी येथील ट्रेनिंगच्या काळात एकमेकांच्या प्रेमात पडले. विशेष म्हणजे टीना यांनी लग्नाआधीच अतहर यांच्यासोबत नात्यात असल्याचं सोशल मीडियावरुन जाहीर केलं होतं.

हेही वाचा :

राजस्थान-दिल्लीनंतर कर्नाटकमध्येही फटाकेबंदी

पंजाब पाठोपाठ राजस्थानमध्ये देखील मोदी सरकारला झटका, केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेहलोत सरकारकडून बिल पास

राजस्थानात फटाक्यांची विक्री आणि आतषबाजीवर बंदी!, कोरोना आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा निर्णय

UPSC Topper IAS Tina Dabi and Athar Khan file for divorce

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.