AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्म आणि जातीच्या मुद्यावर लोकांची पोटं भरत नाहीत, बेरोजगारी, महागाई आणि शेतीच्या प्रश्नांवर प्रियंका गांधींनी भाजपला घेरले

देशातील अनेक सामान्य माणसांच्या रोजीरोठीचा प्रश्न गंभीर झाला आहे. महागाईमुळे आम्ही काहीच विकत घेऊ शकत नाही ही वास्तव परिस्थिती असल्याचे प्रियंका गांधी यांनी सांगितले.

धर्म आणि जातीच्या मुद्यावर लोकांची पोटं भरत नाहीत, बेरोजगारी, महागाई आणि शेतीच्या प्रश्नांवर प्रियंका गांधींनी भाजपला घेरले
| Edited By: | Updated on: Feb 12, 2022 | 7:19 AM
Share

नवी दिल्लीः उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकांसाठी कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी ऑनलाईनच्या (Online Meeting) माध्यमातून त्यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकेची झोड उठवली. उत्तर प्रदेशमधील या प्रचारदरम्यान सांगितले की, उत्तर प्रदेशमधील मुख्य समस्या ही येथील बेरोजगारी, आणि महागाईचा प्रश्न गंभीर आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. या सगळ्या समस्या असतानाही येथील नागरिक रोजी रोठी कमवण्यासाठी धडपडत आहेत.

पेट्रोल आणि डिझेलचे दर तर एवढे वाढले आहेत की, ते तुम्ही सहजासहजी खरेदी करू शकत नाही, तर कुटुंबा चालवणाऱ्या कुटुंबाप्रमुखांकाकडे घरात गॅस सिलिंडेर घ्यायला पैसे नाहीत अशी अवस्था येथील नागरिकांची झाली आहे. या सगळ्या समस्यांचा प्रश्न गंभीर असतानाही येथील लोकं या परिस्थितीबरोबर लढत आहेत. भाजप सरकारने या लोकांना वाऱ्यावर सोडले आहे. उद्योगपतींसाठी मात्र हे सरकार सगळी व्यवस्था करत आहेत.

देशातील संपत्ती भाजप सरकार आपल्या मित्रांना वाटत आहे, त्यामुळे श्रीमंत व्यापारी अतिश्रीमंत होत आहेत. तर दुसरीकडे मात्र सामान्य आणि मध्यम व्यापाऱ्यांसाठी काहीही करण्यात येत नाही. प्रियंका गांधी म्हणाल्या की, मी ज्या ज्या मतदार संघात दौरा करते त्या त्या मतदार संघातील मतदार सांगतात की, रोजी रोठीचा प्रश्न गंभीर झाला आहे. महागाईमुळे आम्ही काहीच विकत घेऊ शकत नाही ही वास्तव परिस्थिती आहे.

वास्तव परिस्थिती ही आहे की, धर्म आणि जातीच्या गोष्टीने आपले पोट नाही भरणार. शिक्षणावर बोलताना त्यांनी सांगितले की, तुम्ही मुलांना यासाठी नाही शिकवत की ते मोठे होतील आणि एकमेकांबरोबर लढत राहतील. आपण आपल्या मुलांना यासाठी शिकवता की ते नोकरी शोधतील आणि आपलं भविष्य घडवतील. प्रियंका गांधी यावेळी सांगितले की, कॉंग्रेसचं जर सरकार आले तर सरकारतर्फे गहू धान्याला प्रतिक्विंटल 2500 हजारचा दर देऊ, शेकऱ्यांची कर्ज माफ करू, तसेच कोरोना काळातील छोटे दुकानदार आणि छोटे व्यापाऱ्यांची वीज बिलं माफ करण्याची अश्वासनं त्यांनी दिली. तर 20 लाख युवकांसाठी रोजगार निर्मिती करण्याच्या अश्वासनाबरोबरच महिलांना सरकारी नोकरीत 40 टक्के आरक्षण देऊ. सरकारतर्फे पोलीस भरती करुन त्यामध्ये 25 टक्के महिलांना संधी देण्याचे अश्वासनही त्यांनी दिले.

संंबंधित बातम्या

Goa Election | नाना पटोले यांच्याशी झालेल्या भेटीचा फोटो tweet करताना संजय राऊत म्हणतात, हम…

Airtel Down : भारतात अनेक ठिकाणी एअरटेलची सेवा ठप्प, कंपनीकडून दिलगिरी

महाविकास आघाडीचं स्टेअरिंग ठाकऱ्यांच्याच हाती, भाजपला पोटदुखीचा त्रास; संजय राऊतांचा हल्लाबोल

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.