AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दूध विक्रेत्याचं किळसवाणं कृत्य, दुधात खूप सारं थुंकला अन्….व्हिडीओ पाहून सगळीकडे संताप!

दूध विक्रेत्याचा एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. तो दुधात चक्क थुंकला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल झाला आहे.

दूध विक्रेत्याचं किळसवाणं कृत्य, दुधात खूप सारं थुंकला अन्....व्हिडीओ पाहून सगळीकडे संताप!
milkman spitting in milk (फोटो सौजन्य- मेटा एआय)
| Updated on: Jul 07, 2025 | 3:37 PM
Share

Milkman Spits In Milk CCTV : भेसळयुक्त अन्न, फळभाज्या हा फारच गंभीर मुद्दा होऊन बसला आहे. भेसळयुक्त अन्न, रसयनांचा वापर करून वाढवण्यात आलेल्या फळभाज्यांमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते. विशेष म्हणजे काही विक्रेते नाल्यातील पाण्यात भाजी-पाला साफ करताना दिसतात. तसे काही व्हिडीओही समोर आलेले आहेत. असे असतानाच आता धक्कादायक असा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत एक दूध विक्रेता चक्क दुधात थुंकताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नेमके प्रकरण काय?

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक दूध विक्रेता चक्क दुधात थुंकताना दिसतोय. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील लखनौ येथील आहे.हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या व्हिडीओनुसार एक दूधवाला एका घरी दूध देण्याआधी त्यात थुंकताना दिसतोय. दुधामध्ये थुंकल्यानंतर त्याने ते घरातील व्यक्तीला देऊ केले आहे.

दूध विक्रेत्या पप्पूला ठोकल्या बेड्या

लखनौ येथील गोमती नगरातील हा व्हिडीओ असून सीसीटीव्ही पाहिल्यानंतर घरामालकाने थेट पोलिसात तक्रार केली आहे. केलेल्या तक्रारीनुसार दुधात थुंकणाऱ्या दूधवाल्याचे नाव मोहम्मद शरीफ उर्फ पप्पू आहे. याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर पप्पू याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी केली जात आहे.

योगी आदित्यनाथ यांनी दिला होता आदेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीची ती कृती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याआधीही असेच काही गंभीर प्रकार समोर आलेले आहेत. काही महिन्यांपूर्वी गाझियाबादमध्ये एका ज्यूस विक्रेत्यावर ज्यूसमध्ये लघवी मिसळल्याचा आरोप करण्यात आला होता. नोएडामध्येही दोन व्यक्तींवर थुंकी मिसलून ज्यूस विकल्याचा आरोप करण्यात आला होता. अशा अनेक घटना समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खाद्यपदार्थांच्या दुकानावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा आदेश दिला होता.

दरम्यान, आता या प्रकरणी पोलीस नेमकं काय करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.