हॉटेलातील रुम नंबर 102, गर्लफ्रेंड आणि 80 दिवस… छांगुर बाबाची कहाणी ऐकून धक्काच बसेल
उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये एटीएसने मोठ्या धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. जमालुद्दीन उर्फ छांगूर बाबा या मास्टरमाइंडला आणि त्याची साथीदार नीतूला अटक करण्यात आली आहे. लोकांना अमिष दाखवून किंवा भोळेपणाचा फायदा घेऊन धर्मांतर करण्यात येत होते. आरोपींवर 100 कोटींहून अधिकच्या व्यवहारांचे आरोप आहेत आणि त्याने अनेक इस्लामिक देशांना भेट दिली होती.

उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील एका मोठ्या धर्मांतर करणाऱ्या रॅकेटचा एटीएसने भांडाफोड केला आहे. एटीएसने या धर्मांतराचा मास्टरमाइंड जमालुद्दीन ऊर्फ छांगूर बाबा याला अटक केली आहे. त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड नीतू ऊर्फ नसरीन हिलाही अटक केली आहे. दोघेही लखनऊच्या विकास नगर परिसरातील एका हॉटेलात तब्बल 80 दिवस लपून बसले होते. दोन्ही आरोपी बलरापूर जिल्ह्यातील मधपूर येथील राहणारे आहेत.
जमालुद्दीन ऊर्फ छांगूर बाबा ऊर्फ पीर बाबा आता एटीएसच्या अटकेत आहे. लोकांच्या भोळेपणाचा फायदा दाखवून तर कधी त्यांना अमिष देऊन त्यांचं धर्मांतर करायचा. भक्तांना तो इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडायचा. छांगूर बाबाने ज्या लोकांचं धर्मांतर केलं होतं, त्यापैकी काही लोकांची लखनऊमध्ये घर वापसी झाली आहे. त्यांनी इस्लाम धर्माचा त्याग करून पुन्हा एकदा हिंदू धर्मात प्रवेश केला आहे.
छांगूर बाबाने काही वर्षापूर्वी बलरामपूर येथील आपल्या गवापासून थोड्या अंतरावरील मधपूर येथे एक घर बनवलं होतं. घरात तो त्याच्या कुटुंबासह नीतू ऊर्फ नसरीनच्या कुटुंबासोबत राहत होता. इथूनच त्याच्या धर्मांतराचे काळे कारनामे सुरू व्हायचे. त्याने या ठिकाणी एक आलिशान कोठीच बांधली होती. ही कोठी बेकायदेशीररिरत्या बांधली होती. ती पाडण्यात आली आहे.
छांगूरवरील आरोप
लालच देऊन गैर मुस्लिमांना मुस्लिम बनवणे
40 हून अधिक बँकात त्याचे अकाऊंटस आहेत. त्यात 100 कोटीहून अधिकचा व्यवहार झाला आहे.
आखाती देशात त्याच्या अकाऊंटवरून पैसे पाठवण्यात आले
छांगूरने 40 इस्लामिक देशात दौरा केलाय
धर्मांतरण करणाऱ्याला जातीच्या हिशोबाने पैसे दिले जायचे. म्हणजे प्रत्येक जातीचं रेट कार्ड ठरलं होतं.
खासकरून धर्मांतर करण्यासाठी मुलींना टार्गेट केलं जायचं.
छांगुर बाबाची सगळ्यात जवळची होती नीतू उर्फ नसरीन आणि तिचा नवरा नवीन उर्फ जमालुद्दीन. दहा वर्षांपूर्वी या दोघांनी धर्मांतर केल्यानंतर छांगूर बाबासोबतच राहायला सुरुवात केली होती. धर्मांतर रॅकेट चालवणारा आणि 50 हजारांचा इनामी असलेला छांगुर बाबा अटक होण्याआधी लखनऊमध्ये लपून बसला होता. लखनऊमधील विकास नगर परिसरात असलेल्या ‘स्टार रूम्स’ नावाच्या हॉटेलमध्ये छांगुर आणि त्याची साथीदार नीतू उर्फ नसरीन यांनी जवळपास 80 दिवस लपून वेळ घालवला. स्टार रूम्सच्या रजिस्टरनुसार, छांगुर आणि नीतूची एंट्री 16 एप्रिल रोजी झाली होती आणि हे दोघं 5 जुलै रोजी बाहेर गेले. बहुतांश वेळ त्यांनी रूम नंबर 102 मध्येच घालवला. दोघांचे आधार कार्ड आणि हॉटेल रजिस्टरमध्ये एंट्री झाली होती.
हॉटेल मालक कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नव्हते. मात्र त्यांनी सांगितलं की सुरुवातीला हे लोक फक्त चार दिवसांसाठी हॉटेलमध्ये थांबले होते. त्यानंतर कधी दोन दिवस, तर कधी चार दिवस असं करत त्यांनी रूमचं बुकिंग वाढवत नेलं. जेव्हा हॉटेल मालकांना वाटलं की हे लोक खूपच दिवस थांबत आहेत, तेव्हा त्यांनी कारण विचारलं. त्यावर नीतूने सांगितलं की तिच्यावर एक खटला आहे आणि त्यासंदर्भात ती लखनऊमध्ये थांबली आहे. त्यांना भेटण्यासाठी एक वकीलही हॉटेलमध्ये आला होता. सध्या दोघेही एटीएसच्या ताब्यात असून चौकशी सुरू आहे.
