AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही जिवंत आहोत… 9 दिवसानंतर नेपाळमध्ये चमत्कार, बोगद्यात अडकलेल्या कामगारांचा आवाज ऐकून बचाव कार्याला वेग

Upper Trishuli 3A Hydropower Project: नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापूराने हजारांहून अधिक जणांचा बळी गेला. तर अद्याप शेकडो जण बेपत्ता आहेत. दरम्यान त्रिशुला नदीवरील जलविद्युत प्रकल्पातील बोगद्यात अडकलेल्या कामगारांचा 9 दिवसानंतर पहिल्यांदा आवाज ऐकू आल्याने बचाव कार्याला वेग आला आहे.

आम्ही जिवंत आहोत... 9 दिवसानंतर नेपाळमध्ये चमत्कार, बोगद्यात अडकलेल्या कामगारांचा आवाज ऐकून बचाव कार्याला वेग
नेपाळमध्ये बचाव कार्याला वेगImage Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 04, 2026 | 9:54 AM
Share

नेपाळमध्ये 26 ऑगस्ट रोजी विनाशकारी महापूर आला. अचानक आलेल्या या महापूराने उत्तर नेपाळमधील पाच जिल्ह्यांना मोठा तडाखा दिला. या नैसर्गिक संकटात हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला. तर अद्यापही अनेक जण बेपत्ता आहेत. गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवल्या जात आहे. नैसर्गिक आपत्तीतही काही चमत्कार, काही दिलासे मिळत आहेत. अनेक जण ढिगाऱ्या खाली दबलेले असतानाही जिवंत बाहेर आले आहेत. दरम्यान नेपाळच्या त्रिशुला जलविदयुत प्रकल्पातील बोगद्यातून कामगारांचा 9 दिवसानंतर आवाज ऐकू आला. गेल्या आठवड्यातही या प्रकल्पाच्या बोगद्यात बचाव पथक गेले होते. पण कोणीच नसल्याचा अंदाज वर्तवत मोहिम थंडावली होती. पण आता या बोगद्यातून कामगाराचा आवाज ऐकू आल्यानंतर बचाव आणि शोध मोहिमेला वेग आला आहे.

आम्ही जिवंत आहोत

रसुवा जिल्ह्यातील अप्पर त्रिशुला 3 ए हायड्रोपॉवर प्रकल्पाच्या बोगद्यात (Upper Trishuli 3A Hydropower Project Tunnel) काही कामगार अडकले होते. यापूर्वी सुद्धा या परिसरात शोध मोहिम राबवली गेली होती. दरम्यान काल बचाव पथकाला कामगारांचे आवाज ऐकू आले. एकापेक्षा अधिक व्यक्ती बोगद्यात असल्याची खात्री झाली. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्याला आता वेग आला आहे.

नेपाळचे लष्कर आणि बचाव पथकाने बोगद्याच्या आता दुरपर्यंत शोध मोहिम राबवली. त्यांनी आवाज दिले. तेव्हा त्यांना प्रतिसाद मिळाला. आम्ही बोगद्यात सुरक्षित असल्याचे कामगारांनी सांगितले. बचाव पथकातील सहभागी अभियंता तसेच खासदार श्रीराम न्यौपाने यांनी सोशल मीडियावर याविषयी एक पोस्ट केल्याचे नेपाळमधील माध्यमांनी दावा केला आहे. त्यानुसार त्यांना बोगद्यातून कामगारांचे आवाज ऐकू आले. त्यांनी आत जिवंत असल्याचे सांगितले. त्यानंतर बचाव पथकाने अजिबात घाबरू नका, आम्ही तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आल्याची माहिती त्यांना दिली. त्यालाही कामगारांनी प्रतिसाद दिला. यामुळे सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. उत्तर नेपाळमधील जलविद्युत प्रकल्पात नेपाळचे आणि भारतीय कामगार मोठ्या प्रमाणात काम करत होते. त्यातील अनेकांचा ठावठिकाणा लागत नसल्याने दुसर्‍यांदा शोध मोहिम हाती घेण्यात आली.

एक व्यक्तीची सुटका

या भीषण नैसर्गित आपत्तीच्या 9 दिवसानंतर अप्पर त्रिशुला 3 ए हायड्रोपॉवर प्रकल्पाच्या बोगद्यातून एका व्यक्तीची सुटका करण्यात आली. ही व्यक्ती जिवंत असल्याचे समोर आल्यानंतर बचाव पथकाने आनंद साजरा केला. या बोगद्यातून एका व्यक्तीची सुटका करण्यात आली असली तरी अद्याप बोगद्यात अजूनही काही कामगार अडकल्याची माहिती समोर येत आहे. ते बचाव पथकाच्या आवाजांना प्रतिसाद देत आहेत.

बचाव कार्यात मोठे अडथळे

पूरामुळे बोगद्यात मोठ्या प्रमाणात चिखल, पाणी आणि मातीचे ढिगारे साचले आहे. यामुळे बचाव कार्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. बचावकार्य अत्यंत धोकादायक आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक झाले आहे. बोगद्यात काही ठिकाणी मोठे दगड आणि मातीचे ढिगारे हटवण्याचे काम अत्यंत काळजीपूर्वक करण्यात येत आहे. त्यासाठी नियंत्रित स्फोटकांचीही वापर करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी