Monsoon : मान्सून म्हणजे नेमके काय? अशिया खंडावर सर्वाधिक परिणाम…!

आतापर्यंत मान्सून म्हणजे नेमके काय ? असा सवाल कोणी उपस्थित केला नसेल पण त्याबाबत माहिती असणेही तेवढेच गरजेचे आहे. तर मान्सून हा शब्द मूळचा अरेबियन भाषेतील आहे. सुरवातीला ब्रिटिशांनी हा शब्द वापरण्यास सुरवात केली. आशिया खंडामध्ये ठरावीक काळात म्हणजे जून ते सप्टेंबर या काळात येणारा पाऊस असा त्याचा साधारण अर्थ होतो. मात्र, या चार महिन्याच्या कालावधीत होणाऱ्या पावसावरच भारतासह अशिया खंडातील अर्थव्यस्था अवलंबून आहे.

Monsoon : मान्सून म्हणजे नेमके काय? अशिया खंडावर सर्वाधिक परिणाम...!
आज पाऊस येणार?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 7:39 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून (Monsoon) मान्सून शब्द जरी उच्चारला तरी, यंदा कसा राहिल पाऊस ? काय म्हणतंय (Meteorological Department) हवामान विभाग अशी वाक्य आपसूकच कानावर पडतात. याबाबत सर्वच काही शास्त्रशुध्द पध्दतीने माहिती असावी असे नाहीतर यंदा काय स्थिती राहील हेच जाणून घेण्यात उत्सुकता दाटलेली असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही (IMD) भारतीय हवामान विभागाने मान्सूनबाबत अंदाज व्यक्त केला आहे. समाधानकारक पाऊस राहणार असून यंदा वेळेपूर्वीच त्याचे आगमन होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मान्सूनचे आगमन आणि नेमका मान्सून म्हणजेच काय हेच आपण आज माहिती करुन घेणार आहोत. शिवाय मान्सूनचा परिणाम कोणत्या क्षेत्रावर अधिक होतोय याची माहिती असणेही गरजेचे आहे.

मान्सून म्हणजे नेमके काय ?

आतापर्यंत मान्सून म्हणजे नेमके काय ? असा सवाल कोणी उपस्थित केला नसेल पण त्याबाबत माहिती असणेही तेवढेच गरजेचे आहे. तर मान्सून हा शब्द मूळचा अरेबियन भाषेतील आहे. सुरवातीला ब्रिटिशांनी हा शब्द वापरण्यास सुरवात केली. आशिया खंडामध्ये ठरावीक काळात म्हणजे जून ते सप्टेंबर या काळात येणारा पाऊस असा त्याचा साधारण अर्थ होतो. मात्र, या चार महिन्याच्या कालावधीत होणाऱ्या पावसावरच भारतासह अशिया खंडातील अर्थव्यस्था अवलंबून आहे. केवळ अर्थव्यवस्थाच नव्हे तर अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती तर यावरच पूर्णत: अवलंबून आहे. या पावसावरच भारतामधली पीक व्यवस्था ही अवलंबून आहे. मान्सून म्हणजे केवळ पाऊसच नाहीतर त्यापुर्वी तापमानातील वाढ, हवामान, वाऱ्याची दिशा यासारख्या गोष्टीदेखील मान्सूनच्या वाटचालीवर परिणाम करणाऱ्या आहेत.

मान्सूनच्या आगमनाचे शास्त्र

सध्या ज्या मान्सूनच्या आगमनाचे वेध लागले आहेत त्या मान्सून पावसाचा संबंध थेट सुर्याशी आहे. पृथ्वीशी सूर्याचा कोन ज्या प्रकारे तयार होतो, त्यानुसार मान्सूनची स्थिती बदलत जाते. मकर संक्रांतीला सूर्य मकरवृत्तावर असतो म्हणजे दक्षिणेकडे असतो. नंतर तो पूर्व गोलार्धाकडे त्याचे भ्रमण सुरू होते. या भ्रमण काळामध्ये तो विषुववृत्त पार करून कर्कवृत्ताकडे जूनच्या अखेरीला पोहचतो. या दरम्यानच पृथ्वीच्या वातावरणातील हवा तापण्याची क्रिया होत असते. यामुळे पाण्याच्या पृष्ठभागाचेही तापमान वाढत जाते. हवेचा दाब कमी होतो. अधिक दाबाकडून कमी दाबाकडे वारे वेगाने वाहतात. जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहणारे वारे पाण्याने भरलेले ढग आपल्यासोबत वाहून आणतात आणि याच ढगांमुळे पाऊस पडतो.

हे सुद्धा वाचा

सर्वकाही मान्सूनवरच अवलंबून

शेती ही थेट पावसावर अवलंबून असली इतर क्षेत्रावरदेखील मान्सूनचा परिणाम आहेच. केवळ काही देश नाही तर अशिया खंडातील बहुतांश देश याच मान्सूनच्या पावसावर अवंलून आहेत. केवळ भारचीच नाही अशिया खंडातील बहुतांश देशातील आर्थिक गणितेही मान्सूनवरच आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात सर्वसाधारण मान्सून राहिलेला नाही. तापमानवाढीचा देखील याच्यावर परिणाम होत आहे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.