What India Thinks Today : काऊंटडाऊन सुरू, उद्योग जगतातील दिग्गज एकाच मंचावर; अर्थव्यवस्थेचा रोडमॅप सांगणार
येत्या 25 तारखेपासून नवी दिल्लीत व्हॉट इंडिया थिंक टुडे समीटचं आयोजन करण्यात आलं आहे. टीव्ही9 नेटवर्कने हे आयोजन केलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. तसेच या शानदार सोहळ्यात देशातील अनेक बडे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी देशातील दिग्गज उद्योजकही उपस्थित राहणार असून देशाच्या अर्थव्यवस्थेचा रोड मॅप सांगणार आहेत.

नवी दिल्ली | 22 फेब्रुवारी 2024 : देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क टीव्ही 9 ने व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या दुसऱ्या सीजनचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली आहे. या वार्षिक फ्लॅगशीप कॉन्क्लेव्हचं आयोजन दिल्लीत 25 फेब्रुवारी रोजी होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. तसेच या शानदार सोहळ्यात देशातील अनेक बडे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी देशातील दिग्गज उद्योजकही उपस्थित राहणार असून देशाच्या अर्थव्यवस्थेचा रोड मॅप सांगणार आहेत. टीव्ही9 नेटवर्कच्या या वार्षिक कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, निर्मला सीतारामन यांच्यासह उद्योग जगतातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
देशातील या सर्वात मोठ्या सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी नारी शक्ती विकसित भारत या विषयावर परिसंवाद होणार आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यावेळी संबोधित करणार आहेत. याशिवाय स्टार्टअप इंडिया या विषयावर उद्योग जगतातील निलेश शाह, जयेन मेहता, सुषमा कौशिक, दीपेंदर गोयल यांच्यासहीत अनेक मान्यवर आपलं भाष्य करणार आहेत. अर्थव्यवस्था आणि इन्फ्रा इन्व्हेस्टेमेंट या विषयावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव भाष्य करणार आहेत. याशिवाय अभिनेत्री कंगना राणावतही या शिखर संमेलनात भाग घेणार आहे.
उद्योग जगतातून कोण कोण येणार?
1. अश्विनी वैष्णव – अश्विनी वैष्णव हे सध्या देशाचे रेल्वे आणि सूचना आणि माहिती प्रसारण मंत्री आहेत. अर्थव्यवस्था आणि इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट या विषयावर होणाऱ्या कार्यक्रमात निर्मला सीतारामण आणि अश्विनी वैष्णव सहभागी होणार आहेत.
2. निर्मला सीतारमन – निर्मला सीतारामन यांनी जेएनयूमधून इकनॉमिक्सची पदवी घेतली आहे. मोदींच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी वाणिज्य आणि संरक्षण मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला होता. त्या कर्नाटकातून राज्यसभेवर निवडून आलेल्या आहेत.
3. मेनका गुरुस्वामी – मेनका गुरुस्वामी या सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील आहेत. मेनका गुरुस्वामी आणि त्यांची पार्टनर अरुंधती काटजू यांचा टाइम मॅगजिनने 2019मध्ये जगातील 100 प्रतिभाशाली व्यक्तींमध्ये समावेश केला होता. परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव विवेक काटजू यांची कन्या अरुंधती काटजू या सर्वोच्च न्यायालयातील वकील आहेत. अरुंधती यांचे आजोबा ब्रह्मनाथ काटजू हे अलहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले होते.
4. विनीता सिंह – टीव्ही शो शॉर्क टँकची जज विनीता सिंह यांनी स्टार्टअपमधील अपयशातून धडा घेऊन शुगर कॉस्मेटिकची सुरूवात केली. आज या कंपनीचा 500 कोटींपेक्षा अधिकचा व्यवसाय आहे. या कंपनीचे देशभरात 130 शहरात आटलेट आहेत. विनीता शिक्षणात अग्रेसर होत्या. त्यांनी 2015मध्ये शुगर कॉस्मेटिकची सुरुवात केली होती.
5. अमन गुप्ता – बोट कंपनीचे को-फाऊंडर अमन गुप्ता यांना लहानपणापासूनच उद्योजक व्हायचे होते. बोट कंपनीच्या आधी त्यांनी अनेक स्टार्टअप सुरू केले. पण त्यात यश मिळाले नाही. त्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. समीर मेहता यांच्यासोबत त्यांनी 2016मद्ये बोट कंपनी सुरू केली. आज या कंपनीच्या उत्पादनांनी बाजारात आपलं स्थान निर्माण केलं आहे.
हे उद्योजकही येणार
आरसी भार्गव
अनीश शाह
ऋतुपर्णा चक्रवर्ती
नीलेश शाह
जयेन मेहता
सुषमा कौशिक
संजय अग्रवाल
दीपिंदर गोयल
गजल अलग
अमिताभ कांत
एस. जयशंकरही उपस्थित राहणार
या कार्यक्रमाला परराष्ट्र मंत्री एस जयशंकरही उपस्थित राहणार आहेत. विविध बहुपक्षीय व्यासपीठांवर ग्लोबल साऊथचे हित आणि या देशांपुढील आव्हानांवर ते बोलणार आहेत. मात्र, ग्लोबल साऊथचं नेतृत्व करण्याची भारताची पूर्ण क्षमता असल्याचं भारताने गेल्यावर्षी पार पडलेल्या जी-20 परिषदेतून दाखवून दिलं आहे. भारताच्या अध्यक्षतेतच आफ्रिकी संघाला जी-20 चं सदस्यत्व देण्यात आलं. या सर्व मुद्द्यांवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर बोलणार आहेत.