AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

What India Thinks Today : खेलो इंडीयाने भारत सुपरपॉवर कसा होणार, अनुराग ठाकूर यांचा काय आहे प्लान पाहा

टीव्ही 9 नेटवर्कच्या 'व्हॉट इंडिया थिंक्स टु़डे ग्लोबल समीट 2024' च्या दुसरा सिझन येत्या 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत होत आहे. यंदाची थिम India: Poised For The Next Big Leap अशी आहे. 'टीव्ही 9 भारतवर्ष' चॅनलने आयोजित केलेल्या या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह जगभरातील बडे नेते सामील होणार आहेत.

What India Thinks Today : खेलो इंडीयाने भारत सुपरपॉवर कसा होणार, अनुराग ठाकूर यांचा काय आहे प्लान पाहा
ANURAG THAKURImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Feb 22, 2024 | 8:37 PM
Share

दिल्ली | 22 फेब्रुवारी 2024 : टीव्ही 9 नेटवर्कचा वार्षिक सोहळा ‘व्हॉट इंडिया थिंक्स टु़डे ग्लोबल समिट 2024′ पुन्हा नवी दिल्लीत भरत आहे. यंदाचे या परिषदेचे दुसरे वर्ष आहे. न्यूज नेटवर्क TV9 च्या या विशेष सोहळ्यात बुद्धीला चालना देणाऱ्या चर्चांसोबत भारताच्या कामगिरीवर प्रकाश झोत टाकला जाणार आहे. रविवारी 25 फेब्रुवारीला होणाऱ्या या सोहळ्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह समाज, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, अर्थव्यवस्था या क्षेत्रातील नामवंत मंडळी आपले विचार मांडून देशाच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडणार आहेत. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, क्रिकेटर सुर्यकुमार यादव यांच्यासह अनेक प्रसिद्ध आणि गुणी खेळाडू या संमेलनात सामील होणार आहेत.

खेलो इंडीया मोहीमेने भारत  शक्ती म्हणून पुढे येत आहे – अनुराग ठाकूर

एकीकाळी फर्स्ट क्लास क्रिकेटपटू असलेले आणि बीसीसीआयचे अध्यक्ष पद भूषविलेले अनुराग ठाकूर केंद्र सरकारमध्ये क्रीडा मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. देशात खेळ संस्कृती रुजावी यासाठी ते प्रयत्नरथ आहेत. क्रीडा क्षेत्रात देशाचे नाव पुढे यावे यासाठी ते कष्ट घेत आहेत. त्यांचे मंत्रालय खेलो इंडीया मोहीमेद्वारे देशातील दुर्गम भागातून नव्या प्रतिभावंत खेळाडूंचा शोध घेत त्यांना संधी देत आहे. देशाला क्रीडा क्षेत्रातही सुपर पॉवर बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘खेलो इंडीया’ ची सुरुवात केली. त्यामुळे देशातील युवकांना त्याचा फायदा होत आहे. क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर हे भारताचे क्रीडा क्षेत्रात नेमकं काय लक्ष्य आहे याविषयी या परिषदेत आपले विचार मांडणार आहेत.

हे खेळाडू सहभाग घेणार

सुर्यकुमार यादव

भारतीय क्रिकेट टीमचा स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव यानी टी 20 क्रिकेटमध्ये आपल्या स्टायलीश आणि विस्फोटक बॅटींगने एक वेगळी ओळख तयार केली आहे. गेल्या एकवर्षांहून अधिक काळ सुर्यकुमार या फॉरमॅटमध्ये जगातील नंबर एकचा फलंदाज म्हणून कायम आहे. आणि त्याने भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुराही सांभाळली होती.

हरमिलन बैंस

भारताची युवा एथलिट हरमिलन बैंस यांनी गेल्यावर्षी एशियन गेम्समध्ये 800 मीटरच्या शर्यतीत सिल्व्हर मेडल जिंकून नवा इतिहास रचला आहे. तसेच 1500 मीटर शर्यतीत तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

पुलेला गोपीचंद

भारताचे माजी बॅडमिंटन स्टार आणि प्रसिध्द कोच पुलेला गोपीचंद यांनी अनेक बॅडमिंटन स्टार देशाला दिले आहेत. सायना नेहवाल, पीव्ही सिंधू सारखे त्यांच्या शिष्यांनी ऑलंम्पिकमध्ये मेडल मिळविली आहेत. देशासाठी नवे बॅडमिंटन स्टार घडविण्याचे त्यांचे कार्य निरंतर सुरु आहे.

आमीर हुसैन

जम्मू-काश्मीर पॅरा क्रिकेट टीमचे कॅप्टन आमिर हुसैन लोन यांची बॅटींगची आगळी शैली पाहून तुम्ही आश्चर्यचकीत झाल्यावाचून राहणार नाहीत. ते केवळ संघाचे नेतृत्वच करीत नाहीत तर अन्य खेळाडूंनाही प्रेरणा देत आहेत. दोन्ही हात नसल्याने मान आणि खांद्यांचा वापर करुन बॅटींग करण्याचा त्यांचा व्हीडीओ अलिकडेच खूप व्हायरल झाला होता.

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.