AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

What India Thinks Today: “…तरच महाराष्ट्रात बुलेट ट्रेन धावेल”, केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितलं ‘बुलेट भविष्य’

गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेला बुलेट ट्रेनचा चेंडू मंत्री वैष्णव यांनी सरकारच्या कोर्टात ढकलला आहे. वर्ष 2026 मध्ये बुलेट ट्रेन प्रत्यक्षात धावेल अशी शक्यता वैष्णव यांनी वर्तविली आहे.

What India Thinks Today: …तरच महाराष्ट्रात बुलेट ट्रेन धावेल, केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितलं 'बुलेट भविष्य'
| Edited By: | Updated on: Jun 18, 2022 | 6:48 PM
Share

नवी दिल्ली : बुलेट ट्रेनचे (Bullet Train) काम प्रगतीपथावर आहे. बुलेट ट्रेन लवकरात लवकर सुरू व्हावी ही महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे. ज्यावेळी महाराष्ट्रातील सरकार मान्यता देईल त्यादिवसापासून त्वरित कामास सुरुवात होईल असे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेला बुलेट ट्रेनचा चेंडू मंत्री वैष्णव यांनी सरकारच्या कोर्टात ढकलला आहे. वर्ष 2026 मध्ये बुलेट ट्रेन प्रत्यक्षात धावेल अशी शक्यता वैष्णव यांनी वर्तविली आहे. टीव्ही 9 ने आयोजित केलेल्या ‘ग्लोबल समिट व्हॉट इंडिया थिंक्स टूडे’ या चर्चासत्रात मंत्री वैष्णव सहभागी झाले होते. बुलेट ट्रेन, 5G नेटवर्क, 6 G नेटवर्क, सेमीकंडक्टरची देशांतर्गत निर्मिती, एक कोटी रोजगाराच्या (job) संधी आदी विषयांवर मंत्री वैष्णव यांनी थेट भाष्य केलं.

…तर, कठोर कारवाई

अग्निपथ योजनेवरुन रेल्वे संपत्तीला युवकांनी लक्ष्य केल्याच्या मुद्द्यावर मंत्री वैष्णव यांनी भाष्य केलं आहे. रेल्वेमुळे सर्वसामान्यांना माफक दरांत दळवळणाच्या सुविधा उपलब्ध होतात. विमान जिथं पोहोचू शकत नाही आणि विमानाचं खर्च पेलू शकत नाही अशा वर्गाला रेल्वे मुळं प्रवास सुकर झाला आहे. रेल्वेचे कायदे कठोर करण्याची आवश्यकता आहे. आंदोलनकर्त्यांची बाजू निश्चितपणे ऐकून घेतली जाईल. मात्र, रेल्वे संपत्तीला कुणीही नुकसान पोहोचू नये आणि हिंसेचा मार्ग अवलंबू नये.

भारतात 5G स्वस्त

चालू वर्षाच्या अखेरीस देशातील 20-25 शहरांत 5G नेटवर्क सुरू होईल. जगाच्या तुलनेत भारतातील 5G हे 10 पट स्वस्त असेल असे वैष्णव यांनी म्हटलं आहे.

वंदे भारतचे जाळे

भारतीय निर्मितीची वंदे भारत एक्स्प्रेस प्रगतीपथावर आहे. काळाप्रमाणे प्रगती होत आहे. लवकरच नव्या रेल्वे दाखल होणार आहेत. देशाचे सर्व भाग वंदे भारत एक्स्प्रेसनं जोडले जातील असे वैष्णव यांनी म्हटलं आहे.

भारत सेमीकंडक्टर हब

भारत सेमीकंडक्टरचं हब बनेल. निर्मिती बाबतचा करार लवकरच प्रत्यक्षात येईल. चालू वर्षाच्या अखेरीस करार पूर्णत्वास जाईल आणि प्रत्यक्षात निर्मितीला सुरुवात होईल. सेमीकंडक्टरच्या निर्मितीत भारत जगाला दिशा जाईल. आगामी काळात जगातील सर्वाधिक सेमीकंडक्टरची निर्मिती भारतात होईल. त्यामुळे सेमीकंडक्टर निर्मिती क्षेत्रात चार-पाच वर्षाच एक कोटी रोजगारांची उपलब्धता होईल. मुबलक रोजगार निर्मिती सोबतच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे भाव घटतील असे वैष्णव यांनी म्हटले आहे.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.